TRENDING:

Weather Alert: राज्यात हाडं गोठवणारी थंडी, 20 डिसेंबरला पारा घसरला, कुठं किती तापमान?

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून काही ठिकाणी थंडीची लाट असल्याचे चित्र आहे. 20 डिसेंबरचा राज्यातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5
राज्यात हाडं गोठवणारी थंडी, 20 डिसेंबरला पारा घसरला, कुठं किती तापमान?
राज्यात थंडीचा कडाका कायम असून बहुतांश भागात हुडहुडी भरत असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोरडे हवामान, कडाक्याची थंडी आणि धुके असे हवामानाचे चित्र राहण्याची शक्यता आहे. 20 डिसेंबर रोजी राज्यातील हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर गारठा कायम आहे. गेल्या 24 तासांत मुंबईतील सांताक्रुझमध्ये 16 अंश तर कुलाब्यात 20.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज मुंबई आणि उपनगरांत आकाश मुख्यत: निरभ्र राहील. तसेच किमान तापमान 17 अंश तर कमाल 33 अंश सेल्सिअसवर राहील.
advertisement
3/5
पुणे परिसरात थंडीची लाट निर्माण झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 8.3 अंशांपर्यंत पारा घसरला आहे. आज हवामान कोरडं राहील. तसेच तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 29 आणि किमान 8 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. पाषाण परिसरात 8 अंश, लोहगाव 13 अंश, चिंचवड 14 अंश, मगरपट्टा 15 अंश आणि कोरेगाव पार्क परिसरात किमान तपमान 13 अंश सेल्सिअसपर्यंत राहील.
advertisement
4/5
20 डिसेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील हवामान कोरडेच राहील. नाशिकमध्ये पारा 7.4 अंशांपर्यंत घसरला असून अहिल्यानगर 7.3 अंश तापमान नोंदवलं गेलंय. तर मराठवाड्यातील बीडमध्ये 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. विदर्भातील नागपुरात 8.5 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात घट झाली असून थंडीचा कडाका वाढला आहे.
advertisement
5/5
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोणतेही मोठे बदल जाणवणार नाहीत. तर किमान तापमानात देखील पुढील 7 दिवस सध्याचीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: राज्यात हाडं गोठवणारी थंडी, 20 डिसेंबरला पारा घसरला, कुठं किती तापमान?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल