TRENDING:

Snake Tips: भांबावून जाऊ नका! अचानक साप समोर आल्यास शांतपणे कराव्या या गोष्टी

Last Updated:
Snake Tips Marathi: चालत असताना अचानक समोर साप आला तर साहजिकच कोणीही घाबरेल...कोणीही मुद्दामून सापाची छेड काढली तर साप आक्रमक होतो. विषारी साप माणसाला चावला तरच जीवघेणा ठरू शकतो. पावसाळा किंवा इतर कुठल्याही वेळी साप, केवळ अन्नासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि स्वसंरक्षणासाठी संचार करत असतो. अनेकदा साप मानवाला इजा न करता शांतपणे पुढे जातात. असं असलं तरी साप दिसला तरी घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला वाचून कदाचित आश्चर्य वाटेल पण‌ यापुढच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचे प्राण वाचू शकतात..
advertisement
1/9
भांबावून जाऊ नका! अचानक साप समोर आल्यास शांतपणे कराव्या या गोष्टी
स्वतः साप पकडण्याची चूक करू नका. हे काम एका निष्णात साप पकडणाऱ्याचं आहे, त्याला ते करू द्या. हे काम तुम्ही स्वतः केलं तर विषारी साप असेल तर तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो.
advertisement
2/9
तुम्ही सापाला चुकीच्या पद्धतीनं चिथावणी दिली तर, साप चावण्याचा धोका वाढू शकतो आणि हे तुमच्या जीवासाठी धोकादायक किंवा घातक देखील ठरु शकतं. तुमच्या घराजवळ दवाखाना नसेल किंवा सर्प पकडणारा तज्ञ नसेल तर कोणतीही चूक करू नका. जर साप विषारी असेल तर तुमचा मृत्यूही होऊ शकतो.
advertisement
3/9
पावसाळ्यात साप बाहेर येण्याची शक्यता अधिक असते. बेडकांच्या शोधात ते त्यांच्या बिळातून बाहेर पडतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या घराच्या आजूबाजूला उद्यानं, जंगल, नद्या, तलाव, झाडं, असतील तर तुम्ही बूट घालूनच घराबाहेर पडणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून चुकूनही तुमचा पाय सापावर पडणार नाही.
advertisement
4/9
अनेक वेळा साप, उंदरांच्या शोधात ढिगाऱ्याखाली, जुन्या इमारतींच्या भेगा, पोकळ भिंतींखाली लपून बसतात, जेणेकरून त्यांना लगेचच उंदरांची शिकार करता येईल. ही शक्यता गृहित धरून, घराभोवतीचं वातावरण कायम स्वच्छ ठेवा. तुमच्या घराच्या आसपास जितके उंदीर, बेडूक जास्त तितके साप तुमच्या घराभोवती फिरण्याची शक्यता जास्त आहे.
advertisement
5/9
घराबाहेर किंवा आत कुठेही साप दिसला तर घाबरू नका आणि शांत राहा. सापाच्या फार जवळ जाऊ नका. जर तुम्ही त्याला मारण्याचा, पकडण्याचा किंवा इजा करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालाल. एक गोष्ट लक्षात ठेवा की साप तुम्हाला चावत नाही, पण अन्नाच्या शोधात बाहेर पडलेला असतो. तुम्हाला साप दिसला तर ताबडतोब वन्यजीव विभागाच्या आपत्कालीन विभागाला फोन करुन कळवा.
advertisement
6/9
तुम्ही पटकन फोटो आणि व्हिडिओ करुन ते वनविभागाच्या क्रमांकावर पाठवा. तुमचा पत्ता, GPS लोकेशन शेअर करा जेणेकरून ते तुमच्या घरी लवकर पोहोचू शकतील.
advertisement
7/9
सापांना बाह्य कान नसतात, त्यामुळे ते तुम्हाला ऐकू शकत नाहीत. तुमच्या घरात कुठेही साप लपला असेल तर तिथून शांतपणे निघून जा. सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करा. त्यामुळे रेस्क्यू टीमला साप शोधून जंगलात सुरक्षितपणे पोहोचवण्यात मदत होईल. अशा परिस्थितीत बचाव पथक येईपर्यंत संयमानं वाट पाहणं योग्य ठरेल. साप आहे हे सगळ्यांना सांगू नका नाहीतर गर्दीमुळे, हालचालींमुळे साप सावध होईल.
advertisement
8/9
तुमच्या घराच्या किंवा उद्यानाच्या बागेत तुम्हाला साप दिसला तरीही शांत राहा. जर साप खूप जवळ असेल तर हळूहळू मागे जाण्याचा प्रयत्न करा. अचानक मोठा आवाज किंवा हालचाल करणं टाळा अन्यथा साप घाबरेल.
advertisement
9/9
अनेकवेळा असं घडतं की तुम्ही घरात खिडकीजवळ बसलेले असता आणि अचानक घराबाहेर साप रेंगाळताना दिसला तर अशा परिस्थितीत त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवा. तो काय करतोय, कुठे जातोय हे पाहत रहा. हे शक्य आहे की ते बागेतील झाडं, आणि उंच गवतात साप यांच्यामध्ये लपलेला असू शकतो. सावध राहा, सतर्क राहा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Snake Tips: भांबावून जाऊ नका! अचानक साप समोर आल्यास शांतपणे कराव्या या गोष्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल