TRENDING:

Dust Storm Alert: गारपीटसोबत नवं संकट, हवामान खात्याकडून हायअलर्ट! या जिल्ह्यांसाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे

Last Updated:
भारतीय हवामान खात्याने २० मे २०२५ रोजी धुळीच्या वादळासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अनेक राज्यांत अलर्ट जारी.
advertisement
1/6
गारपीटसोबत नवं संकट, IMD कडून अलर्ट! या जिल्ह्यांसाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे
धुळीच्या वादळासह पावसाचा सर्वात मोठा इशारा भारताच्या हवामान खात्याने दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांना इशारा देण्यात आला आहे. कोणत्या राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे, ते हवामान विभागाकडून जाणून घेऊया.
advertisement
2/6
२० मे २०२५ रोजी भारतीय हवामान खात्याने एक मोठा इशारा जारी केला आहे. आज एक मोठे धुळीचे वादळ येणार आहे. यासोबतच मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. देशात कुठे कुठे इशारा देण्यात आला आहे ते जाणून घ्या.
advertisement
3/6
पश्चिम राजस्थानमध्ये आज धुळीच्या वादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, पूर्व राजस्थानमध्येही धुळीच्या वादळाचा इशारा देण्यात आला आहे. येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
4/6
आज दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि उत्तर अंतर्गत कर्नाटक, आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज, आयएमडीने या दोन्ही ठिकाणी मुसळधार पावसासाठी सर्वात मोठा रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
5/6
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, घाटटमाथा परिसरात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. या भागात ताशी 60 किमी वेगाने वारे वाहतील. शिवाय काही ठिकाणी गारपिटीचाही महाराष्ट्रात इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना अलर्ट दिला आहे.
advertisement
6/6
बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, रायलसीमा, तेलंगणा आणि किनारी आंध्र प्रदेशातही आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व ठिकाणांसाठी ऑरेंज अलर्ट (वेदर अपडेट लेटेस्ट न्यूज) जारी करण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Dust Storm Alert: गारपीटसोबत नवं संकट, हवामान खात्याकडून हायअलर्ट! या जिल्ह्यांसाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल