TRENDING:

चक्क बायकांसारखं सिंदूर लावून आणि साडी नेसून पुरुष खेळतात गरबा, अशी काय आहे परंपरा?

Last Updated:
नवरात्रीला पुरुष आणि स्त्रिया देहभान विसरून गरबा खेळतात. गरबा खेळण्यासाठी स्त्रिया चनियाचोली तर पुरुष विविध प्रकारचे जॅकेट्स आणि कपडे खरेदी करतात. पण तुम्ही कधी पाहिलंय का की पुरुष स्त्रियांप्रमाणे साडी नेसून भांगेत सिंदूर भरून गरबा खेळताना? पण देशातील गुजरात या राज्यात एका समाजात ही परंपरा असून येथील पुरुष नवरात्रीच्या दिवसात साडी घालून मंदिराच्या बाहेर गरबा खेळतात.
advertisement
1/5
चक्क बायकांसारखं सिंदूर लावून आणि साडी नेसून पुरुष खेळतात गरबा, काय आहे परंपरा?
पुरुष महिलांप्रमाणे साडी नेसतात, नंतर कपाळावर सिंदूर लावतात आणि मग गरबा करतात. तुम्हाला हे ऐकायला विचित्र वाटेल. पण, हा गरबा जरा खास आहे. अहमदाबादच्या कोड एक्स्टेंशनमध्ये नवरात्रीच्या आठव्या दिवशी ही आशय प्रकारे गरबा खेळण्याची ही अनोखी परंपरा आहे.
advertisement
2/5
यामध्ये पुरुष महिलांचे कपडे घालून रात्री गरबा खेळतात. ही परंपरा एका सत्य घटनेवर आधारित आहे. अहमदाबाद पेशव्यांच्या अधिपत्याखाली असताना, राज्यकर्त्यांनी शहरातील रहिवाशांची गुप्त माहिती गोळा करण्यासाठी चाडियो नावाच्या गुप्तहेराचा वापर केला.
advertisement
3/5
तेव्हा गुप्तहेरांनी बारोट समाजातील सदूबा हरिसंग या मुलीला पाहिले आणि तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाले. चडियोने शासकाला या सुंदर स्त्रीला तो आपल्या राजवाड्यात घेऊन येईल असे सांगितले. शासक देखील स्त्रीला भेटण्यासाठी उत्सुक होता त्याने आपल्या सैनिकांना सदूबाला राजवाड्यात आणण्याचे आदेश दिले होते.
advertisement
4/5
सदूबाचा पती हरसिंग याने तिला पाठवण्यास नकार दिला त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धाच्या वेळी काही बारोट लोकांनी त्यांच्या सुरक्षेसाठी साडी नेसून घरात आश्रय घेतला. बारोट समाज सदुबाला वाचवण्यात अयशस्वी ठरला आणि तिने बारोट समाजाला शाप दिला. सदुबाच्या मृत्यूनंतर तेथे मंदिर बांधण्यात आले.
advertisement
5/5
सदू माता मंदिर असे नाव देण्यात आले. बारोट समाजाच्या लोकांमध्ये जवळपास शतकभर हा शाप कायम राहिला. शापापासून मुक्ती मिळावी म्हणून सदू मातेला वचन देण्यात आले की नवरात्रीला बारोटचे पुरुष महिलांच्या रूपात सदू मां मंदिरात येतील आणि गरबा खेळतील, तेव्हापासून नवरात्रीच्या आठव्या रात्री पुरुष बारोट समाजातील महिलांचे कपडे परिधान करून मंदिराच्या चौकात गरबा खेळतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
चक्क बायकांसारखं सिंदूर लावून आणि साडी नेसून पुरुष खेळतात गरबा, अशी काय आहे परंपरा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल