TRENDING:

नक्षलवाद्यांची कंबर मोडली, स्फोटकं शोधली, जवानांचं सुरक्ष कवच ROLO चा मधमाशांच्या हल्लात मृत्यू

Last Updated:
ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई झाली. सीआरपीएफचा बेल्जियन शेफर्ड रोलो मधमाशांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला. त्याला मरणोत्तर डीजी प्रशंसा प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
advertisement
1/8
नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान K9 Rolo चा मृत्यू, मधमाशांचा हल्ला जीवावर बेतला
ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टने नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले. तेलंगणा आणि छत्तीसगडमधील केरागुट्टालू टेकड्यांमध्ये २१ दिवस चाललेल्या माओवादविरोधी मोहिमेत मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
advertisement
2/8
या कारवाईत मोठ्या संख्येने नक्षलवादी मारले गेले आहेत, ज्यात त्यांच्या अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. या मोहिमेत सुरक्षा दलांचेही नुकसान झालं. या कारवाईत सीआरपीएफचा दोन वर्षांचा बेल्जियन शेफर्ड मालिनोइस रोलो मृत्युमुखी पडला.
advertisement
3/8
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात नाही तर मधमाशांचा हल्ला त्याच्या जीवावर बेतला. खरंतर, २७ एप्रिल रोजी मधमाश्यांनी रोलोवर हल्ला केला. रोलोला मरणोत्तर महासंचालक (डीजी) प्रशंसा प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
advertisement
4/8
छत्तीसगडमधील पोलिस आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी दलाच्या के9 पथकाने त्याच्यावर औपचारिक अंत्यसंस्कार केले. त्याला अखेरचा निरोप देताना जवानांचे डोळे पाणावले होते.
advertisement
5/8
रोलो आतापर्यंत जवानांचं सुरक्षा कवच होता. नक्षलवाद्यांनी जागोजागी पेरलेली स्फोटकं किंवा संभाव्य धोके तो शोधून काढत होता. शिवाय या मोहिमेदरम्यान जंगलात रस्ता दाखवण्यासाठी देखील त्याने मदत केली होती.
advertisement
6/8
रोलोला पेट्रोलिंग आणि स्फोटके शोधण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं होतं. यानंतर, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांना माओवादविरोधी कर्तव्यासाठी तैनात करण्यात आले. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट दरम्यान, रोलोने एका आठवड्यासाठी टेकड्यांमधून सुरक्षितपणे पथकांचे नेतृत्व केले.
advertisement
7/8
[caption id="attachment_1396495" align="alignnone" width="750"] २७ एप्रिल रोजी तळावर परतत असताना हा अपघात झाला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीनं उपचार देण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.</dd> <dd>[/caption]
advertisement
8/8
सीआरपीएफच्या मते, के९ रोलोचा जन्म ५ एप्रिल २०२३ रोजी डीबीटीएस येथे झाला आणि त्याला बॅच क्रमांक ८० मध्ये डीबीटीएस येथे पायदळ गस्त, स्फोटक शोध आणि हल्ल्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर, एप्रिल २०२४ मध्ये नक्षलविरोधी कारवायांसाठी त्याला २२८ बीएन, सीआरपीएफमध्ये तैनात करण्यात आले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
नक्षलवाद्यांची कंबर मोडली, स्फोटकं शोधली, जवानांचं सुरक्ष कवच ROLO चा मधमाशांच्या हल्लात मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल