बहिणीच्या मैत्रिणीवर जडलं प्रेम, 7 वर्ष डेटिंग, पण लग्नात केलं असं काही की... मराठमोळ्या क्रिकेटरची भन्नाट लव्हस्टोरी!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
हा भारतीय क्रिकेटर त्याच्या बहिणीच्या मैत्रिणीच्याच प्रेमात पडला. तब्बल ७ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. पण त्यांच्या लग्नाचा किस्साही अतिशय भन्नाट आहे.
advertisement
1/9

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिका धोपावकर यांची लव्हस्टोरी अतिशय भन्नाट आहे. राधिका अजिंक्यच्या बहिणीची मैत्रीण होती. हे दोघे लहानपणापासूनच एकमेकांना ओळखायचे.
advertisement
2/9
पण हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतील आणि पुढे जाऊन लग्नही करतील, याचा अंदाज त्यांनाही नव्हता! जाणून घेऊया त्यांच्या या गोड लव्हस्टोरीची सुरुवात कशी झाली, आणि लग्नाचा तो मजेशीर किस्साही, जेव्हा अजिंक्य थेट जीन्स घालून लग्नाला पोहोचला होता!
advertisement
3/9
अजिंक्य आणि राधिका दोघेही मुंबईतील मुलुंडमध्ये एकाच कॉलनीत लहानाचे मोठे झाले. त्यामुळे घरच्या भेटीगाठी आणि शाळेत-कॉलेजमध्ये भेटणं हे त्यांच्यासाठी अगदी नेहमीचंच होतं. लहानपणापासूनच त्यांच्यात एक छान मैत्रीचं नातं तयार झालं होतं.
advertisement
4/9
कॉलेजमध्ये एकत्र फिरताना, वेळ घालवताना त्यांची ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली आणि २००७ मध्ये त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. लग्नाआधी त्यांनी तब्बल ७ वर्ष एकमेकांना डेट केलं.
advertisement
5/9
अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांचं लग्न २६ सप्टेंबर २०१४ रोजी मुंबईत पारंपरिक मराठी पद्धतीने मोठ्या थाटामाटात पार पडलं. या सोहळ्याला कुटुंबातील सदस्य आणि अनेक क्रिकेटपटूंसह तब्बल १५०० हून अधिक लोक उपस्थित होते.
advertisement
6/9
या लग्नातील एक मजेशीर किस्सा म्हणजे, अजिंक्य स्वतः आपल्या लग्नासाठी चक्क टी-शर्ट आणि जीन्स घालून पोहोचला होता! हे पाहून राधिका अर्थातच थोडी नाराज झाली.
advertisement
7/9
पण नंतर अजिंक्यने सगळे पारंपरिक लग्नाचे कपडे घालून पुन्हा 'ग्रँड एंट्री' केली आणि सगळे हसू लागले. ऑक्टोबर २०१९ मध्ये या जोडप्याने त्यांची मुलगी आर्या हिचं, तर ऑक्टोबर २०२२ मध्ये मुलगा राघव याचं स्वागत केलं.
advertisement
8/9
राधिकाने मुंबईतील विनायक गणेश वाझे कॉलेजमधून 'इंटेरिअर डिझाईन'ची पदवी घेतली आहे. राधिकाला अजिंक्यची सर्वात मोठी फॅन मानलं जातं. अजिंक्यच्या प्रत्येक महत्त्वाच्या सामन्याला आणि दौऱ्यांवर ती त्याच्यासोबत असते.
advertisement
9/9
२०२३ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलदरम्यान अजिंक्यला बोटात दुखापत झाली होती. त्यावेळी राधिकाने अजिंक्यने दाखवलेल्या धैर्याचं खूप कौतुक केलं होतं. सध्या अजिंक्य रहाणे टीम इंडियातून बाहेर असला तरीही आयपीएलमध्ये मात्र तो अजूनही सक्रिय आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
बहिणीच्या मैत्रिणीवर जडलं प्रेम, 7 वर्ष डेटिंग, पण लग्नात केलं असं काही की... मराठमोळ्या क्रिकेटरची भन्नाट लव्हस्टोरी!