TRENDING:

PCOD आणि PCOS चा त्रास असल्यास काय खाणे टाळावे? आहारात कशाचा समावेश असावा?

Last Updated:
धावपळीच्या युगात आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातीलच एक महिलांमधील समस्या म्हणजे PCOD आणि PCOS. अनेक महिलांमध्ये PCOD आणि PCOS या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. हार्मोनल असंतुलनामुळे होणारी अनियमित मासिक पाळी, वजन वाढणे, केसगळती, चेहऱ्यावर आणि शरीरावर अनावश्यक केस येणे, तसेच गर्भधारणेत अडचणी अशा तक्रारी अनेक महिलांमध्ये आढळतात.
advertisement
1/7

2/7
अनेक महिलांमध्ये PCOD आणि PCOS च्या त्रासांवर औषधोपचार आवश्यक असले तरी तज्ज्ञांच्या मते योग्य आहार व जीवनशैलीतील बदल देखील महत्त्वाचा ठरतो. हा त्रास असल्यास आहारात कोणत्या बाबींचा समावेश करावा? याबाबत माहिती गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. अनुभूती पाटील यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
डॉ. अनुभूती पाटील यांच्या सांगण्यानुसार, जास्त साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स हे PCOD–PCOS असल्यास शरीरासाठी घातक ठरू शकतात. मिठाई, कोल्ड्रिंक्स, पेस्ट्री, पांढरी ब्रेड, पास्ता, नूडल्स यांचा वापर टाळावा. जंक फूड आणि तळलेले पदार्थ जसे बर्गर, पिझ्झा, समोसा, पकोडे हे वजन वाढवतात आणि हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात.
advertisement
4/7
तसेच जास्त फॅट असलेले पदार्थ जसे बटर, चीज, क्रीम आणि तुपकट मांसाहार हेही हानिकारक आहेत. पॅकेज्ड स्नॅक्स, रेडी-टू-ईट पदार्थ, जास्त मीठ असलेले चिप्स आणि प्रोसेस्ड फूड हे शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवतात. त्यामुळे हे सर्व पदार्थ आहारात घेणे टाळावे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
advertisement
5/7
PCOD–PCOS वर नियंत्रण ठेवण्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा आहे. हिरव्या पालेभाज्या, हंगामी भाज्या आणि कमी गोड फळांचा समावेश करावा. सफरचंद, पेरू, संत्री, डाळिंब यासारखी फळे उपयुक्त ठरतात. संपूर्ण धान्ये जसे ज्वारी, बाजरी, नाचणी, ब्राउन राईस आणि ओट्स शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतात.
advertisement
6/7
प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये डाळी, कडधान्ये, अंडी, मासे आणि डाळींपासूनचे सूप यांचा आहारात समावेश असावा. बदाम, अक्रोड, फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स यांसारखा सुकामेवा आणि बिया हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात.
advertisement
7/7
दिवसभर पुरेसे पाणी पिणे, ग्रीन टी आणि हर्बल टी घेणे शरीर डिटॉक्स होण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच PCOD–PCOS हा त्रास घालवण्यासाठी नियमित व्यायाम, योगासने, ताण कमी करणाऱ्या क्रिया आणि पुरेशी झोप हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
PCOD आणि PCOS चा त्रास असल्यास काय खाणे टाळावे? आहारात कशाचा समावेश असावा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल