काम नाही म्हणून रडताय? सागरचा हा संघर्ष बघा, डोळ्यांवर विश्वास बसणार नाही!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापुरातील एका खाजगी कॉलेजमध्ये एम. ए सेकंड इयरमध्ये शिकत आहे. सागर दिव्यांग असूनही जिद्द न सोडता शहरात डिलिव्हरी बॉयचे काम प्रामाणिकपणे पार पाडत आहे.
advertisement
1/7

दिव्यांग असूनही निराश न होता, जिद्दीनं उभं राहत सोलापूर शहरात दिव्यांग सागर जाधव हा तरुण एका खाजगी कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करत आहे. डिलिव्हरी बॉयचे काम करत करत तो शिक्षण सुद्धा शिकत आहे.
advertisement
2/7
तर या कामातून दिव्यांग सागर हा महिन्याला 15 हजार रुपयापर्यंत कमाई करत आहे. पाहुयात दिव्यांग सागर जाधव या तरुणाची ही प्रेरणादायी कहाणी.
advertisement
3/7
सागर विष्णू जाधव वय 23 रा. ओम गर्जना चौक सैफुल सोलापूर असे एका खाजगी कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तर सोलापुरातील एका खाजगी कॉलेजमध्ये एम. ए सेकंड इयरमध्ये शिकत आहे. सागर दिव्यांग असूनही जिद्द न सोडता शहरात डिलिव्हरी बॉयचे काम प्रामाणिकपणे पार पाडत आहे.
advertisement
4/7
सागर जाधव याला एका फाउंडेशन मार्फत तीन चाकी असलेली चार्जिंग व्हीलचेअर बाईक मोफत देण्यात आली आहे. त्या बाईकवर बसून सागर हा सोलापूर शहरात डिलिव्हरी बॉयचे काम करत आहे. सोलापूर शहरातील कन्ना चौक, सात रस्ता, जोड बसवणा चौक, अशोक चौक, गांधीनगर, रंगभवन, मंगळवार बाजार आदी परिसरात ऑनलाइन फूड डिलिव्हरी करत आहे.
advertisement
5/7
कोणावर अवलंबून न राहता एका खासगी कंपनीत तो डिलिव्हरी बॉय बनून आपली स्वप्नं साकार करण्याचा प्रयत्न करत आहे. मोबाइलवर आलेली प्रत्येक ऑनलाइन ऑर्डर हॉटेलमधून घेऊन संबंधितांच्या घरी पोहोचवत आहे. कंपनीही त्याला इतरांपेक्षा जास्त पैसे देऊन प्रोत्साहनही देत आहे.
advertisement
6/7
तसेच ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीत काम करत करत सागर जाधव हा घरबसल्या ठिकाणीही परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे ऑनलाइन पद्धतीने पॅन कार्ड, मतदान कार्ड बनवून देण्याचं काम ही तो करत आहे. फूड डिलिव्हरीचे काम करून सागर हा महिन्याला 15 ते 16 हजार रुपयांची कमाई करत आहे.
advertisement
7/7
सोलापूर शहरात इलेक्ट्रिक बाईकच्यsol साह्याने घरपोच अन्नपदार्थांचे पार्सल डिलिव्हरी करून सागर जाधव हा तरुण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे. आयुष्यात इतका मोठा संघर्ष असूनही सागरच्या चेहऱ्यावरचं हसू जरा देखील कमी झालेलं नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
काम नाही म्हणून रडताय? सागरचा हा संघर्ष बघा, डोळ्यांवर विश्वास बसणार नाही!