TRENDING:

Pune: पुण्यात नवले पुलावर मृत्यूतांडव, कंटेनरने अनेक वाहनांना चिरडलं; 5 जणांचा मृत्यू झाल्याची भीती, घटनास्थळावरचे PHOTOS

Last Updated:
भरधाव ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली आणि त्यानंतर आग लागली. या घटनेमध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत २० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
advertisement
1/9
पुण्यात नवले पुलावर मृत्यूतांडव, कंटेनरने वाहनांना चिरडलं; 5 जणांचा मृत्यू
पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली आणि त्यानंतर आग लागली. या घटनेमध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत २० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
2/9
पुण्याच्या नवले ब्रिजवर संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. भरधाव कंटेनरचं ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला असल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
3/9
पुणे बंगळुरू महामार्गावर हा अपघात घडला होता. भरधाव कंटेनरचं ब्रेक फेल झालं आणि समोर येईल त्या वाहनांना उडवत पुढे गेला. फोटोमध्ये स्पष्ट दिसतंय की, महामार्गावर अनेक वाहनं रस्त्यावर उलटलेली पाहण्यास मिळत आहे.
advertisement
4/9
नवले पुलावर अनेक गाड्यांना धडक दिली आहे. एक मारुती सुझुकी डिझायर कारचा या अपघातात चक्काचूर झाला आहे.
advertisement
5/9
नवले पुलावर अनेक गाड्या रस्त्यावर उलटलेल्या आहे. यामध्ये अनेक गाड्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
advertisement
6/9
नवले पुलावर हा अपघात इतका भीषण होता की, कंटेनरने समोर येईल त्या वाहनाला धडक दिली. यामध्ये एक मिनी व्हॅनचा चुराडा झाला आहे.
advertisement
7/9
भरधाव कंटेनरने वाहनांना धडक देत पुढे गेला. त्यानंतर एका कंटेनरला जाऊन धडकला. यावेळी दोन्ही कंटेरनमध्ये एक कार सापडली. या कारमध्ये ३ ते ५ जण होते अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
8/9
या धडकेनंतर दोन्ही कंटेनरने अचानक पेट घेतला होता.त्यामुळे कंटेनरचालक बाहेर पडले होते. पण दोन्ही कंटेनरच्यामध्ये एक कार अडकली होती.
advertisement
9/9
या घटनेनंतर २ अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कंटेनलरला लागलेली आग विझवण्यात आली आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर २० जण जखमी झाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune: पुण्यात नवले पुलावर मृत्यूतांडव, कंटेनरने अनेक वाहनांना चिरडलं; 5 जणांचा मृत्यू झाल्याची भीती, घटनास्थळावरचे PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल