नवले पुलावर मृत्यूचा 'कंटेनर', 2 कंटेरनमध्ये सापडलेल्या कारचे भयावह PHOTOS, प्रवाशांचा कोळसा
- Published by:Sachin S
Last Updated:
पुण्यातील नवले पुलावर एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली. जवळपास २ किलोमिटर हे कंटेनर समोर येईल त्या वाहनांना धडक देत पुढे जात होता.
advertisement
1/8

पुणे शहरात मृत्यूचा पूल म्हणून ओळखला जाणाऱ्या नवले पुलावर भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव कंटेनर जवळपास २० ते २५ वाहनांना धडक दिली. या अपघातात ७ ते ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडला आहे.
advertisement
2/8
पुण्यातील नवले पुलावर एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली. जवळपास २ किलोमिटर हे कंटेनर समोर येईल त्या वाहनांना धडक देत पुढे जात होता.
advertisement
3/8
भरधाव कंटेनरचं ब्रेक फेल झालं आणि समोर येईल त्या वाहनांना उडवत पुढे गेला. फोटोमध्ये स्पष्ट दिसतंय की, महामार्गावर अनेक वाहनं रस्त्यावर उलटलेली पाहण्यास मिळत आहे.
advertisement
4/8
नवले पुलावर या कंटेनरने जवळपास २० ते २५ गाड्यांना धडक दिली. एक मारुती सुझुकी डिझायर कारला कंटेनरने जोराची धडक दिली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.
advertisement
5/8
नवले पुलावर हा अपघात इतका भीषण होता की, कंटेनरने समोर येईल त्या वाहनाला धडक दिली. यामध्ये एक मिनी व्हॅनचा चुराडा झाला आहे.
advertisement
6/8
भरधाव कंटेनरने वाहनांना धडक देत पुढे गेला. त्यानंतर एका कंटेनरला जाऊन धडकला. यावेळी दोन्ही कंटेरनमध्ये एक कार सापडली. या कारमध्ये ३ ते ५ जण होते अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
7/8
कंटेनरने जेव्हा कारला धडक देऊन समोर उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळला तेव्हा मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर तिन्ही वाहनांना आग लागली
advertisement
8/8
जेव्हा त्या कंटेनरने कारला धडक दिली तेव्ही ती कार समोरील ट्रकच्या खाली गेली होती. यावेळी ट्रकमधील लोकांना बाहेर पडण्यास वेळच मिळाला नाही. त्यांचा जागेवरच कोळसा झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
नवले पुलावर मृत्यूचा 'कंटेनर', 2 कंटेरनमध्ये सापडलेल्या कारचे भयावह PHOTOS, प्रवाशांचा कोळसा