Weather Alert: सोमवारी हवामानात मोठे बदल, या जिल्ह्यांत हाडं गोठवणारी थंडीची लाट, IMD चा यलो अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात येत्या आठवड्यात हवामानात मोठे बदल जाणवणार असून काही जिल्ह्यांत थंडीची लाट निर्माण होणार आहे.
advertisement
1/7

राज्यात आज काही भागांत ढगाळ वातावरण पहायला मिळाले. तर सकाळी आणि रात्री गारठ्यात वाढ झाली आहे. विदर्भात तापमानाचा पारा घसरला असून तो ९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्याला ‘कोल्ड वेव्ह’चा इशारा देण्यात आला आहे. ८ डिसेंबर मुंबईसह महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
मुंबईत आठवड्याची सुरुवात गारठ्याने होणार आहे. मुंबईत आज २० अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आलं. गुरूवार पर्यंत किमान तापमान 16 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येणार आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात थंडी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
पुण्यात देखील गारठा कायम आहे. आगामी दोन दिवसात पुण्यातील किमान तापमान ९ अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याचे शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना हाडं गोठवणारी थंडी अनुभवायला मिळेल. आज पुण्यात १२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रात देखील आगामी दोन ते तीन दिवसांत गारठा वाढणार आहे. किमान तापमान ९ अंश सेल्सिअस पर्यंत खाली येवू शकते. रविवारी नाशिक मध्ये १२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तर ८ तारखेला ११ अंश सेल्सिअस इतके तापमान असेल.
advertisement
5/7
सोमवारी मराठवाड्यातील किमान तापमानात १ अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. तर त्यानंतर तापमानात घट होणार आहे. मराठवाड्यात किमान तापमान ९ अंश सेल्सिअस पर्यंत खाली येणार असून थंडीची तीव्र लाट येणार आहे.
advertisement
6/7
विदर्भात सध्या थंडीची लाट असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. नागपूर मध्ये ७ डिसेंबर रोजी हाडं गोठवणारी थंडी जाणवली. तर भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात सोमवारी शीत लहरीचा इशारा दिला आहे.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यात दोन दिवसांपीसून काही भागात ढगाळ आकाश पहायला मिळाले. ढगाळ वातावरण निवळल्यानंतर राज्यातील गारठ्यात वाढ होणार आहे. राज्यातील अनेक भागांत गारठा वाढणार असल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: सोमवारी हवामानात मोठे बदल, या जिल्ह्यांत हाडं गोठवणारी थंडीची लाट, IMD चा यलो अलर्ट