Weather Alert: पुणे ते कोल्हापूर धो धो कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रात 24 तासांसाठी अलर्ट, आजचा हवामान अंदाज
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कोल्हापूर ते पुणे घाटमाथ्यावर जोरदार पवसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/7

राज्यात गेल्या काही काळात पावसाचा जोर कायम आहे. जुलै महिन्यात सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत हलका पाऊस पडेल.
advertisement
2/7
मागील 24 तासात पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात 2 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. पुढील 24 तासात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच कमाल तापमान 29 अंशावर पोहचण्याचा अंदाज आहे. पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावचसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
3/7
कोल्हापूर परिसरात 6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा यलो अलर्ट कायम आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमान 28 अंश सेल्सिअसवर राहिल.
advertisement
4/7
गेल्या 24 तासांमध्ये सातारा शहरात 20 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. कमाल तापमान 27.1 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमान 28 अंशावर राहील. ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
5/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच राहिली. 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 30 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
6/7
सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा चांगलाच चढला असून मागील 24 तासात 34 अंशावर राहिला. तसेच 0.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात रिमझिम पावसाची शक्यता आहे. यावेळी पारा 33 अंशांवर राहील.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील काही दिवस घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार असून इतर ठिकाणी तुरळक हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पुणे ते कोल्हापूर धो धो कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रात 24 तासांसाठी अलर्ट, आजचा हवामान अंदाज