Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट, 24 तासात हवा बदलणार, 4 जिल्ह्यांत धो धो कोसळणार
- Published by:Shankar Pawar
 - Reported by:Priti Nikam
 
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. पुढील 24 तासानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. 
advertisement
1/7

 मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील प्रणाली निवळताच राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. आज 4 नोव्हेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात बुधवारपासून पुन्हा मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पुणे ते कोल्हापूर आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
 पुणे जिल्ह्यात सोमवारी तुरळक पाऊस झाला. आज पुन्हा विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. मंगळवारी 30.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज यात वाढ होण्याची शक्यता असून पारा 31 पार जाण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
 गेल्या 24 तासात सातारा जिल्ह्यात तुरळक हलका पाऊस झाला. आज संपूर्ण साताऱ्यासह घाटमाथ्यावर विजांसह पावसाचा अंदाज आहे. 24 तासानंतर हवामानात मोठे बदल जाणवणार असून बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 2 दिवस सातारा जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
4/7
 कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी तुरळक पाऊस झाला. आज पुन्हा हलक्या पावसाची शक्यता असून 24 तासानंतर पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. गुरुवारपासून 3 दिवस विजांसह जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. आज तापमान 30 अंशांवर राहील.
advertisement
5/7
 सोलापूर जिल्ह्यात सोमवारी 33.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर बुधवारी पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने वादळी पावसाचा इशारा दिला आहे. यावेळी पारा 32 अंशावर पोहचण्याचा अंदाज आहे.
advertisement
6/7
 सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 29.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शिराळा परिसरात अवकाळी पावसाने काढणीत आलेल्या भात पिकाचे नुकसान केले. आज जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता असून बुधवारी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
advertisement
7/7
 दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी संकट घोंघावत आहे. 24 तासात हवामानात मोठे बदल होणार असून वादळी पावसाचा अंदाज आहे. बुधवारपासून सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करेला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट, 24 तासात हवा बदलणार, 4 जिल्ह्यांत धो धो कोसळणार