Weather Alert : महाराष्ट्रात आता बर्फासारखी थंडी पडणार, 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
7 डिसेंबर रोजी विदर्भात शीत लहरींचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच इतरही ठिकाणी गारठा कायम आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी बोचरी थंडी नागरिकांना सहन करावी लागत आहे.
advertisement
1/7

राज्यातील तापमानात सतत चढ-उतार सुरू असताना विदर्भातील तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांत एक अंकी तापमान नोंदवले गेले आहे. 6 डिसेंबर आणि 7 डिसेंबर रोजी विदर्भात शीत लहरींचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच इतरही ठिकाणी गारठा कायम आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी बोचरी थंडी नागरिकांना सहन करावी लागत आहे. काही भागांत दुपारच्या वेळी देखील गारवा कायम आहे. पाहुयात 7 डिसेंबर रोजी राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
मुंबईसह उपनगरात 7 डिसेंबर रोजी धुक्यासह अंशतः ढगाळ आकाश राहून वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. अजूनही मुंबईतील तापमानात घट झालेली नाही. तेथील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके असू शकते.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात सतत चढ-उतार सुरू असून गारवा कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश राहून वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असू शकते.
advertisement
4/7
मराठवाड्यातही गारठा कायम आहे. मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये निरभ्र आकाश राहील. तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असू शकते. मराठवाड्यातील इतर शहरांतही तापमानात चढ-उतार कायम असणार आहे. तसेच सकाळी आणि रात्रीच्या वेळी गारवा जास्त जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातही हुडहुडी कायम आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये 7 डिसेंबर रोजी निरभ्र आकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे. तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असू शकते. उत्तर महाराष्ट्रातील इतर शहरांत देखील तापमान 12 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भात गारठा वाढला आहे. नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांत 9 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले आहे. 7 डिसेंबर रोजी विदर्भातील तीन जिल्ह्यांना शीत लहरींचा इशारा देण्यात आला आहे. त्यात नागपूर, गोंदिया आणि यवतमाळचा समावेश असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या तिन्ही जिल्ह्यांतील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 ते 12 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
राज्यातील तापमानात सतत चढ-उतार सुरू असताना विदर्भातील तापमान घट झाली आहे. तेथील काही जिल्ह्यांना शीत लहरींचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भात कडाक्याची थंडी जाणवण्याची शक्यता आहे. तसेच इतरही भागांत हुडहुडी कायम आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात आता बर्फासारखी थंडी पडणार, 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट