TRENDING:

Pune Accident : कोंढवा परिसरात थरकाप उडवणारा भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली येऊन महिलेचा मृत्यू

Last Updated:
Kondhwa Accident : पुण्यातील कोंढवा इथून अपघाताची एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. यात ट्रकच्या चाकाखाली येऊन महिलेचा मृत्यू झाला
advertisement
1/7
कोंढवा परिसरात थरकाप उडवणारा भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली येऊन महिलेचा मृत्यू
पुण्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. आता आणखी एक भीषण अपघात समोर आला आहे. ज्यात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला.
advertisement
2/7
ही घटना पुण्यातील कोंढव्यात घडली आहे. कोंढव्यातील इस्कॉन चौकाच्या पुढे हनुमान मंदिराजवळ हा भीषण अपघात झाला आहे.
advertisement
3/7
या अपघातात ट्रकच्या चाकाखाली येऊन एका महिलेचा जीव गेला आहे. अपघात इतका भीषण होता, की पाहणारे सगळेच हादरले
advertisement
4/7
या घटनेत स्कुटीवर प्रवास करत असलेली महिला दुचाकीसह ट्रकच्या चाकाखाली आली. अपघात इतका भीषण होता, की यात स्कुटीचाही अक्षरशः चुराडा झाल्याचं पाहायला मिळालं
advertisement
5/7
या घटनेनंतर लगेचच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. घटनेत जखमी महिलेच्या भोवती अनेक लोक मदतीसाठी जमा झाले. अपघातामुळे परिसरात वाहनांच्याही रांगा लागल्या होत्या
advertisement
6/7
सकाळी झालेल्या या अपघातामध्ये महिला गंभीररित्या जखमी झाली होती. यानंतर तिला उपचारासाठी लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
advertisement
7/7
मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. रमा कपाडे (वय ५३) असं अपघातामध्ये मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Accident : कोंढवा परिसरात थरकाप उडवणारा भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली येऊन महिलेचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल