Pune Rain: पश्चिम महाराष्ट्रात आता मुसळधार पावसाचे दिवस, 3 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Pune Rain: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे घाट घाटमाथ्यावर रेड अलर्ट तसेच कोल्हापूर जिल्ह्यास यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
1/7

राज्यात मान्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान असल्याने आज दिनांक 24 जुलै रोजी कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे घाट घाटमाथ्यावर रेड अलर्ट तसेच कोल्हापूर जिल्ह्यास यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
2/7
मागील 24 तासात पुणे जिल्ह्यात 3.5 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. यावेळी कमाल तापमानाचा पारा 26.9 अंश सेल्सिअसवर पोहोचला. पुढील 24 तासात पुणे घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच पुढील 24 तासात पुण्यातील कमाल तापमान 28 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात हलका पाऊस कोसळला. सातारा परिसरामध्ये 0.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 25.7 अंश सेल्सिअस राहिल. सातारा घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा रेड अलर्ट हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 24.6 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमान 26 अंशावर पोहचेल. तसेच कोल्हापूर घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा रेड अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्हात मागील 24 तासात 5.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कमाल तापमानाचा पारा 29.2 अंशावर पोहचला आहे. पुढील 24 तासात कमाल तापमान 32 अंशावर राहण्याची शक्यता आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता कायम आहे. मागील 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
6/7
यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 30 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहील. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
7/7
पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा रेड अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यास येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Rain: पश्चिम महाराष्ट्रात आता मुसळधार पावसाचे दिवस, 3 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट