Buddha Purnima 2024: गौतम बुद्धांना कशी झाली होती ज्ञानप्राप्ती? बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहित नाही!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
असं मानलं जातं, की या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता आणि याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्तीही झाली होती. गौतम बुद्धांचं जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. बुद्ध हे बौद्ध धर्माचे प्रवर्तक होते.
advertisement
1/6

भारतामध्ये इतर तिथी आणि सण-वारांसह बुद्धपौर्णिमाही साजरी केली जाते. असं मानलं जातं, की या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता आणि याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्तीही झाली होती. गौतम बुद्धांचं जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. बुद्ध हे बौद्ध धर्माचे प्रवर्तक होते. इसवी सन पूर्व 483मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि इसवी सन पूर्व 563मध्ये महापरिनिर्वाण (मृत्यू) झालं होतं. बालपणी ते राजकुमार सिद्धार्थ या नावाने ओळखले जात होते. बौद्ध ग्रंथानुसार, गौतम बुद्धांच्या जन्माच्या 12 वर्षांपूर्वी एका ऋषींनी भाकीत केलं होतं, की हे मूल महान सम्राट होईल किंवा महान ऋषी होईल. वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती.
advertisement
2/6
बुद्ध गौतम गोत्रातले होते. त्यांचं खरं नाव सिद्धार्थ गौतम होतं. शाक्य प्रजासत्ताकची राजधानी कपिलवस्तुजवळ लुंबिनी इथे त्यांचा जन्म झाला. सिद्धार्थच्या जन्मानंतर सात दिवसांनी त्यांच्या आईचं निधन झालं. मावशी गौतमी यांनी त्यांचं पालनपोषण केलं. शाक्य वंशाचे राजा शुद्धोधन हे सिद्धार्थचे वडील होते.
advertisement
3/6
सिद्धार्थच्या जन्मापूर्वीच्या भविष्यवाणीमुळे तो तपस्वी होईल अशी भीती त्याच्या वडिलांना होती. मुलगा तपस्वी होऊ नये म्हणून वडिलांनी त्याला सतत राजवाड्याच्या हद्दीत ठेवलं. राजेशाही विलासात तो वाढला. बाहेरच्या जगापासून तो एकदम अनभिज्ञ होता. नृत्यांगनांकडून होणारं मनोरंजन, ब्राह्मणांची शिकवणी अशा वातावरणात तो वाढला. त्याला धनुर्विद्या, तलवारबाजी, कुस्ती, पोहणं आणि धावण्याचं प्रशिक्षणही दिलं गेलं होतं. लहान वयातच राजकुमारी यशोधराशी सिद्धार्थचा विवाह झाला. दोघांनाही एक मुलगा झाला. या मुलाचं नाव राहुल ठेवण्यात आलं होतं.
advertisement
4/6
सिद्धार्थ लहानपणापासूनच अत्यंत दयाळू होता. त्याला महालाबाहेर पडू न देण्याचे खूप प्रयत्न करूनही वयाच्या 21व्या वर्षी सिद्धार्थ कपिलवस्तूच्या रस्त्यांवर फिरला. तेव्हा त्याला चार दृश्यं दिसली. एक वृद्ध अपंग व्यक्ती, एक रुग्ण, एक मृतदेह आणि एक साधू अशी ती दृश्यं होती. ही चार दृश्यं पाहून सिद्धार्थला समजलं, की प्रत्येक जण जन्माला येतो, प्रत्येक जण वृद्ध होतो, प्रत्येक जण आजारी पडतो आणि एक दिवस सर्वांचा मृत्यू होतो. यामुळे व्यथित होऊन त्याने आपलं ऐश्वर्य, पत्नी, पुत्र व राज्य सोडून संन्यासी जीवन स्वीकारलं. जन्म, वृद्धत्व, वेदना, आजार आणि मृत्यू या प्रश्नांच्या शोधात तो निघाला.
advertisement
5/6
नीट लक्ष केंद्रित करून तपश्चर्या करूनही या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत. म्हणून इतर काही जोडीदारांसह त्याने अधिक कठोर तपश्चर्या सुरू केली. त्यात सहा वर्षं गेली. भुकेमुळे मृत्यूजवळ पोहोचूनही प्रश्नांची उत्तरं न मिळाल्याने त्याने काही तरी वेगळं करण्याचा विचार सुरू केला. अन्नाच्या शोधात सिद्धार्थ एका खेडेगावात गेला आणि तिथं थोडं अन्न मिळवलं.
advertisement
6/6
यानंतर, कठोर तपश्चर्या सोडून तो एका पिंपळाच्या झाडाखाली (आता तो बोधिवृक्ष म्हणून ओळखला जातो) बसला. सत्य जाणून घेतल्याशिवाय उठणार नाही, असा निश्चय त्याने केला. तो रात्रभर बसून राहिला. असं मानलं जातं, की हा तोच क्षण होता जेव्हा सिद्धार्थचा बुद्ध झाला. सकाळी बुद्धांना पूर्ण ज्ञान प्राप्त झालं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Buddha Purnima 2024: गौतम बुद्धांना कशी झाली होती ज्ञानप्राप्ती? बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहित नाही!