बुद्धपौर्णिमेला दुर्मीळ योग; 4 राशींच्या व्यक्तींना होणार मोठा धनलाभ
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
बुद्धपौर्णिमेच्या दिवशी शनी कुंभ राशीत असणं आणि पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात असणं हा योग अनेक दशकांनंतर बनला आहे. त्यामुळे यंदाची बुद्धपौर्णिमा चार राशींच्या व्यक्तींना विशेष ठरणार आहे. त्या राशी कोणत्या, हे जाणून घेऊ या.
advertisement
1/6

सध्या वैशाख महिना सुरू आहे. वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला बुद्धपौर्णिमा असं म्हटलं जातं. कारण या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता. या वर्षी बुद्धपौर्णिमा 23 मे रोजी आहे. यंदा या दिवशी असलेली शनीची विशेष स्थिती अनेकांना धनसंपदा देऊ शकते. त्याविषयी अधिक जाणून घेऊ या.
advertisement
2/6
अलीकडेच म्हणजे 6 मे रोजी शनीने नक्षत्र परिवर्तन करून पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश केला होता. शनी सध्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत आहे. बुद्धपौर्णिमेच्या दिवशी शनी कुंभ राशीत असणं आणि पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात असणं हा योग अनेक दशकांनंतर बनला आहे. त्यामुळे यंदाची बुद्धपौर्णिमा चार राशींच्या व्यक्तींना विशेष ठरणार आहे. त्या राशी कोणत्या, हे जाणून घेऊ या.
advertisement
3/6
कुंभ : शनी ग्रह या राशीच्या व्यक्तींवर कृपा करील. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. गुंतवणूक केल्यास लाभ होईल. पार्टनरशिपमध्ये बिझनेस करणाऱ्यांना खूप नफा होईल. वैवाहिक जीवनात आनंद येईल. व्यक्तिमत्त्व बहरेल. कौटुंबिक जीवनात आनंद असेल.
advertisement
4/6
मेष : या राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्न वाढू शकतं. पगारवाढ मिळू शकते. तसंच, एखादी नवी संधी मिळू शकते. गेल्या काही दिवसांत खर्चांमध्ये जी वाढ झाली होती, ती आता नियंत्रणात येईल. विद्यार्थ्यांची एकाग्रता चांगली असेल. व्यापारात मोठं डील मिळू शकतं. तसंच, एखादी नियोजित बाब यशस्वी होऊ शकते.
advertisement
5/6
तूळ : तूळ राशीच्या व्यक्तींसाठी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी तयार होत असलेला धनयोग भाग्यवृद्धी करील. करिअरमध्ये उच्च पद प्राप्त होऊ शकतं. घरात आनंदाचं वातावरण राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. उत्पन्न वाढू शकेल. एखादी चांगली बातमी मिळू शकेल. मंगलकार्यात सहभागी व्हाल.
advertisement
6/6
वृषभ : बुद्धपौर्णिमेपासून वृषभ राशीच्या व्यक्तींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. आत्मविश्वास वाढेल. प्रमोशन मिळेल. ईप्सित पद मिळू शकतं. गुंतवणुकीतून लाभ होईल. व्यापाऱ्यांना पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. दिवसेंदिवस प्रगती कराल. खासगी जीवनातलं अत्यंत महत्त्वाचं काम पूर्ण झाल्यामुळे आनंद वाटेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
बुद्धपौर्णिमेला दुर्मीळ योग; 4 राशींच्या व्यक्तींना होणार मोठा धनलाभ