Chanakya Niti: असा सोबती असण्यापेक्षा नसलेला बरा! वेळीच एकमेकांपासून दूर होण्यात शहाणपण
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Chanakya Niti tips marathi: आचार्य चाणक्य सांगतात की, माणसाची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याचा मान किंवा आदर. जीवनात मान-आदर खूप कष्टाने मिळतो. व्यक्तीनं आपल्या सन्मानाशी कधीही तडजोड करू नये.
advertisement
1/6

नीती शास्त्रात चाणक्यांनी सांगितलंय की, एखाद्या व्यक्तीसाठी सन्मान दुखावणं म्हणजे विषाचा घोट घेण्यासारखं आहे. असं वारंवार होत राहिल्यास माणसाचा आदर कमी होतो आणि त्याची स्वत:ची प्रतिमा डागाळते.
advertisement
2/6
आचार्य चाणक्य म्हणतात की, अपमानाचे घोट विषापेक्षा कडवट असतात. आयुष्यात कधी अशी वेळ येते, जेव्हा एखाद्याच्या चुकांमुळे अपमान सहन करावा लागतो. विनाकारण अपमान सहन करावा लागला तर ते विषाचा घोट घेण्यासारखे असते.
advertisement
3/6
चाणक्य म्हणतात की, एकदा अपमान सहन करण्यात शहाणपणा आहे. दुसऱ्यांदा अपमान सहन केल्यानं माणूस महान होतो, पण तिसऱ्यांदा अपमान सहन करणे हा मूर्खपणा आहे.
advertisement
4/6
आपल्यापैकी बर्याच लोकांना जीननात बरेच काही कसं सहन करावं हे माहीत आहे. परंतु, सतत अपमान सहन केल्यानं तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. ईर्ष्येमुळे किंवा जीवनातील अपयशाने त्रस्त असलेले लोक अनेकदा उघडपणे इतरांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात.
advertisement
5/6
चाणक्य म्हणतो की, जर तुमचा एखाद्याकडून वारंवार अपमान होत असेल तर त्याला तसे करण्यापासून थांबवा, कारण ज्याप्रमाणे भूतकाळ परत येत नाही, त्याचप्रमाणे तुमचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही ताबडतोब प्रत्युत्तर दिले नाही तर त्याचं धैर्य आणखी वाढेल. त्यामुळे पुन्हा तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करेल.
advertisement
6/6
चाणक्य म्हणतात की, जर कोणी वारंवार तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला ताबडतोब थांबवा. असे न केल्यानं आपला आदर कमी होतो आणि इतर लोकही तुमच्याबद्दल वाईट बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Chanakya Niti: असा सोबती असण्यापेक्षा नसलेला बरा! वेळीच एकमेकांपासून दूर होण्यात शहाणपण