hanuman janmotsav 2024 : हनुमान जन्मोत्सवाला ही खबरदारी आवर्जून घ्या, आज कोणत्या गोष्टी टाळाल, आताच वाचा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
प्रत्येक वर्षी चैत्र पौर्णिमेला संकट मोचन हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. आज मंगळवारी 23 एप्रिल रोजी सर्वत्र हनुमान जन्मोत्सव साजरा केला जात आहे. हनुमान जन्मोत्सवाला हनुमानाच्या दर्शन-पूजनाचे विधान आहे. या दिवशी हनुमानाची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून सर्वजण बजरंगबलीची पूजा, प्रार्थना करतात. तसेच नैवेद्यही अर्पण करतात. पण आज काही विशेष गोष्टींची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. (अभिषेक जायसवाल/वाराणसी, प्रतिनिधी)
advertisement
1/6

काशीचे ज्योतिषाचार्य पंडित संजय उपाध्याय यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी त्यांची पूजा आराधनेसोबतच आणखी काही असे कार्य आहेत, ज्यामुळे हनुमानाला प्रसन्न केले जाऊ शकते. ते कार्य कोणते आहेत, ते जाणून घेऊयात.
advertisement
2/6
पंडित संजय उपाध्याय यांनी सांगितले की, हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही तुमची विचारधारा अत्यंत सात्विक अशी ठेवायला हवी. हनुमान ब्रह्मचारी होते. त्यामुळे तुम्ही आज ब्रह्मचर्याचे पालन करायला हवे. यामुळे हनुमान प्रसन्न होतात.
advertisement
3/6
पंडित संजय उपाध्याय यांनी पुढे सांगितले की, याशिवाय हनुमान जन्मोत्सवाला रुग्ण आणि गरजूंची सेवा करायला हवी. असे केल्याने हनुमानाची कृपा मिळते.
advertisement
4/6
यासोबतच जर तुम्ही प्रभू श्रीरामाची पूजा करत आहात, तर त्यामुळेही हनुमान प्रसन्न होतात. तसेच भक्तांची मनोकामना, त्यांच्या इच्छा पूर्ण करतात, असे ते म्हणाले.
advertisement
5/6
पण यासोबतच हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी खोटे बोलू नये. यादिवशी मांसाहार, मद्यपान अजिबात करू नये. याशिवाय केस आणि नखेही कापू नये.
advertisement
6/6
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती ही राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद साधल्यानंतर लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक असून लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
hanuman janmotsav 2024 : हनुमान जन्मोत्सवाला ही खबरदारी आवर्जून घ्या, आज कोणत्या गोष्टी टाळाल, आताच वाचा