TRENDING:

Ganesh Chaturthi 2024: घरी, मंडपात गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा अभिजित मुहूर्त! चुकूनही या चुका करू नयेत

Last Updated:
Ganesh Chaturthi 2024: सगळीकडे गणेशोत्सवाची धूम आहे. गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केली जाते. यंदा 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. 11 दिवसांच्या विधीवत पूजेनंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते.
advertisement
1/6
घरी, मंडपात गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा अभिजित मुहूर्त! या चुका करू नये
गणपती पूजा केव्हा करता येईल? -ज्योतिष आणि वास्तुतज्ज्ञ पंडित प्रिया शरण त्रिपाठी म्हणाले, " गणेश चतुर्थी सार्वजनिकरित्या साजरी करण्याची परंपरा स्वातंत्र्य चळवळीशी जोडलेली आहे. देशबांधवांना एकत्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते."
advertisement
2/6
गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त -चतुर्थी तिथी 7 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.38 आहे. भद्राची निवृत्ती संध्याकाळी 5:38 नंतर होईल. उदयतिथीनुसार संपूर्ण दिवस चतुर्थी मानला जाईल. 7 सप्टेंबरलाच गणेश चतुर्थी साजरी होणार आहे, गणपतीची स्थापनाही होईल. गणेश चतुर्थीला मूर्ती आणि कलश स्थापनेसाठी अभिजित मुहूर्त शुभ मानला जातो. या वर्षी चतुर्थीला अभिजीत मुहूर्त सकाळी 11:54 ते दुपारी 12:44 पर्यंत आहे. या वर्षी गणेश चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11.03 ते दुपारी 1:34 पर्यंत आहे.
advertisement
3/6
"चतुर्थीच्या दिवसापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपतीची पूजा केली जाते. चंद्राला अर्घ्य अर्पण करूनच चतुर्थीचा चंद्र पाहता येतो. चतुर्थीचा चंद्र थेट पाहणं अशुभ असते. दुसरं म्हणजे चंद्र उगवल्यावर गणपतीची स्थापना होते. त्यामुळे सर्व प्रकारची संकटं आणि दुःख दूर करण्यासाठी गणपतीची पूजा केली जाते," अशी माहिती ज्योतिष आणि वास्तुतज्ज्ञ पंडित प्रियशरण त्रिपाठी यांनी दिली.
advertisement
4/6
गणपतीची स्थापना कशी करावी? -गणेश चतुर्थीची सुरुवात 6 सप्टेंबरला दुपारी 3:01 ला सुरू होईल. 7 सप्टेंबरला संध्याकाळी 5:37 वाजता संपेल. उदयतिथीनुसार 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी तुम्ही घरात आणि चौकात गणपतीची स्थापना करू शकता. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज गणेशाची पूजा करा. गणपतीची पार्थिव रूपात पूजा का केली जाते, कारण माता पार्वतीने सर्वात आधी गणपतीची स्थापना आपल्या मळातून केली होती. गणेश चतुर्थीच्या दिवशी उपवास करून गणपतीची स्थापना करावी.
advertisement
5/6
गणेश स्थापनेत ही चूक टाळा -गणपतीची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही घरी गणपतीची स्थापना करत असाल तर पूजेचे काही नियम पाळावे लागतात. दररोज सकाळ संध्याकाळ श्रीगणेशाच्या मूर्तीसमोर दिवा लावून पूजा करावी. जेवढे दिवस तुमच्या घरात किंवा चौकात गणपती ठेवला आहे, तेवढे दिवस दिवसातून किमान तीन वेळा नैवेद्य दाखवावा. गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर सात्विक भोजन करावे.
advertisement
6/6
गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा आणि उपवास करा. गणपतीला मोदकाचा नैवेद्य करा. गणपतीच्या मूर्तीचे योग्य दिशेला तोंड ठेवा आणि ती जागा गंगाजलने शुद्ध करा. तसेच गणपतीच्या पूजेत स्वच्छता आणि पावित्र्याची विशेष काळजी घ्या.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Ganesh Chaturthi 2024: घरी, मंडपात गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा अभिजित मुहूर्त! चुकूनही या चुका करू नयेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल