TRENDING:

देवाला नैवेद्य अर्पण करताना, नेमकं काय लक्षात ठेवावं, जाणून घ्या, योग्य नियम

Last Updated:
हिंदू सनातन परंपरेत घरात दररोज देवांची पूजा केली जाते. तसेच देवाला नैवेद्य दिला जातो. असे करणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सुख शांती कायम राहते. तसेच देवाची कृपा संपूर्ण कुटुंबावर कायम असते. (दुर्गेश सिंह राजपूत/नर्मदापुरम, प्रतिनिधी)
advertisement
1/10
देवाला नैवेद्य अर्पण करताना, नेमकं काय लक्षात ठेवावं, जाणून घ्या, योग्य नियम
मध्यप्रदेशातील नर्मदापुरमचे ज्योतिषाचार्य पं. पंकज पाठक यांच्याशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, दररोज घरात पूजा करुन देवी देवाला नैवेद्य अर्पण करणे खूप महत्त्वाचे मानले गेले आहे.
advertisement
2/10
पूजा केल्यानंतर देवाला नैवेद्य न दाखवणे पूजा अपूर्ण मानली गेली आहे. मात्र, नैवेद्य दाखवण्याचेही काही विशेष नियम आहेत.
advertisement
3/10
जर आपण त्या नियमांनुसार, देवी देवांना नैवेद्य अर्पण केला तर ते त्याचा स्विकार करतात. सोबतच काही मंत्र आहेत, जे देवाला नैवेद्य अर्पण करताना म्हटले तर देव आपला नैवेद्य स्विकारतात.
advertisement
4/10
यासोबत आण कोणत्या पत्रात देवाला नैवेद्य अर्पण करावा, याचीही काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे जाणून घेऊयात देवाला नैवेद्य अर्पण करताना कोणती काळजी घ्यावी तसेच किती काळ त्यांच्यासमोर नैवेद्य ठेवावा.
advertisement
5/10
पं. पंकज पाठक यांनी सांगितले की, देवी देवतांना नैवेद्य अर्पण करताना लगेच ते ताट हटवू नये. तसेच जास्त वेळही ठेऊ नये. देवाजवळ 5 मिनिटे ते ताट ठेवावे. त्यानंतर ते ताट उचलून घ्यावे. देवाला नैवेद्य दाखवताना तीन वेळ त्याला पाणी फिरवावे
advertisement
6/10
पौराणिक मान्यतेनुसार, जास्त वेळ नैवेद्य ठेवल्याने विश्वकसेन, चंदेश्वर, चन्डान्शु आणि चांडाली नावाच्या वाईट शक्ती येऊन जातात. म्हणून नैवेद्य वेळेनुसार ठेवावा आणि वेळेनुसार उचलून घ्यावा.
advertisement
7/10
ते म्हणाले, देवी देवतांना त्यांचा आवडता नैवेद्य अर्पण केल्यास तुमची मनोकामना लवकर पूर्ण होते. यासोबतच नैवेद्याला जास्त लोकांमध्ये वितरीत करावे तसेच स्वत:ही खावे. कारण जास्त लोकांना नैवेद्य मिळतो, त्या सर्वांना लाभ मिळतो. तसेच त्यांना पूर्ण फळ मिळते.
advertisement
8/10
मात्र, नैवेद्य अतिशय सात्विक आणि स्वच्छ पद्धतीने तयार व्हायला हवा. तसेच नैवेद्य अर्पण करताना नेहमी सोने, चांदी, तांबे, लाकडी किंवा मातीच्या भांड्यात ठेवायला हवे. नैवेद्य कधीही लोखंड, स्टील किंवा प्लास्टीकच्या ताटात ठेऊ नये. याला शुभ मानले जात नाही.
advertisement
9/10
देवाला नैवेद्य अर्पण करताना तुम्ही त्वदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये गृहाण सम्मुखो भूत्वा प्रसीद परमेश्वर या मंत्राचा जप करावा. यामुळे देव लवकर नैवेद्य स्विकारतात.
advertisement
10/10
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती ही, राशी, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी आणि आचार्यांशी बोलून लिहिली गेली आहे. ज्योतिषांकडून मिळालेली ही माहिती सार्वजनिक आहे. तसेच याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
देवाला नैवेद्य अर्पण करताना, नेमकं काय लक्षात ठेवावं, जाणून घ्या, योग्य नियम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल