TRENDING:

Chaturmas: देव झोपण्यापूर्वी तुळशीला अर्पण करून घ्या या गोष्टी; चातुर्मासात येणार नाही कसलं संकट

Last Updated:
Ashadi Ekadashi 2024: हिंदू धर्मात प्रत्येक एकादशीचं वेगळं महत्त्व आहे, पण देवशयनी एकादशी आणि देवउठणी एकादशीला अत्यंत महत्त्व आहे. देवशयनी एकादशीपासून जगाचा रक्षक भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये 4 महिने निद्रा घेतात आणि त्यानंतर देवउठणी एकादशीला ते जागे होतात, या काळात कोणतेही शुभ किंवा मंगल कार्ये होत नाहीत.
advertisement
1/6
देव झोपण्यापूर्वी तुळशीला अर्पण करा या गोष्टी; चातुर्मासात येणार नाही कसलं संकट
यावेळी देवशयनी एकादशी 17 जुलै 2024, बुधवारी साजरी होणार आहे. पाहुया देवशयनी एकादशीच्या दिवशी तुळशीमातेची पूजा कशी केली जाते.
advertisement
2/6
तुळस ही भगवान विष्णूची आवडती मानली जाते, म्हणून तुळशीची पूजा केल्याने श्री हरीचा आशीर्वाद मिळू शकतो.
advertisement
3/6
देवशयनी एकादशीला तुळशीपूजनाचे विशेष महत्त्व आहे. श्रीहरी तुळशीवर खूप प्रेम करतात. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते.
advertisement
4/6
देवशयनी एकादशीला तुळशीला लाल रंगाची चुनरी अर्पण करावी. तुळशीला लाल रंगाची चुनरी अर्पण केल्यानं जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते, असे मानले जाते.
advertisement
5/6
देवशयनी एकादशीच्या दिवशी तुळशीला लाल धागाही बांधावा, यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि श्री हरी आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
advertisement
6/6
देवशयनी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला कच्चे दूध अर्पण करावे, त्याशिवाय तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावून तिची भक्तीभावानं पूजा केल्यास सर्व दु:खांचा नाश होतो. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Chaturmas: देव झोपण्यापूर्वी तुळशीला अर्पण करून घ्या या गोष्टी; चातुर्मासात येणार नाही कसलं संकट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल