ग्रहणात मंदिरांचे दरवाजे का करतात बंद? यामागची मान्यता आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
चंद्र ग्रहण असोत किंवा सुर्य ग्रहण, प्रत्येक ग्रहणाला सर्वच प्रमुख मंदिरांचे दरवाजे हे ग्रहण सुटेपर्यंत बंद ठेवतात. हे फक्त मोठी मंदिरच नाही तर घरातील देवाऱ्याला देखील लोक करतात.
advertisement
1/5

मान्यतेनुसार ग्रहणाच्या दिवशी अन्न सर्व खाद्यपदार्थांमध्ये तुळशीचं पान टाकलं जातं. पण ग्रहणाशी संबंधीत अशा अनेक परंपरा आहेत, ज्याबद्दल लोकांना ठावूक नाही.
advertisement
2/5
हिंदू धर्मात ग्रहणाबाबत काही परंपरा अनेक काळापासून चालत आलेल्या आहेत. ज्यामध्ये या काळात अन्न खाऊ नये असं देखील सांगितलं जातं. तसेच अन्न बनवू ही नये अशी ही मान्यता आहे. शिवाय या काळात झोपेवरही प्रभाव पडतो असं ही काही लोक मानतात.
advertisement
3/5
अशीच एक परंपरा म्हणजे मंदिराचे दरवाजे बंद करणे. मंदिराव्यतिरिक्त घरातील पूजास्थान देखील कपड्यांनी झाकलं जातं. या परंपरेमागे अनेक प्रकारच्या धार्मिक समजूती आहेत.
advertisement
4/5
असं सांगितलं जातं की या काळात दैवी शक्तिंचा प्रभाव कमी होऊन असुरी शक्तींचा प्रभाव वाढतो, त्यामुळे या काळात पूजापाठ करण्यास मनाई आहे. मान्यते नुसार ग्रहणकाळात मूक अवस्थेत राहून मंत्राचा जप करावा.
advertisement
5/5
पण या मागचं वैज्ञानिक कारण जाणून घेतलं तर असं सांगितलं जातं की अशा वातावरणात हानिकार किरणांचा प्रभाव अधिक असते, त्यामुळे या काळात खाण्या पिण्यास मनाई आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
ग्रहणात मंदिरांचे दरवाजे का करतात बंद? यामागची मान्यता आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या