TRENDING:

Dog Crying: मध्यरात्री कुत्र्याचं रडणं अशुभ का मानतात? वाईट बातमी, अमंगळ घडण्याशी संबंध..!

Last Updated:
crying of dog: अनेकदा रात्री आपण झोपेत असताना बाहेरून एक विचित्र रडण्याचा आवाज येतो, ज्यामुळे आपल्याला अचानक जाग येते. हा आवाज ऐकून अनेक वेळा भीती वाटते. आपण बाहेर बघतो तेव्हा लक्षात येतं की, रस्त्यावर, कुत्रा रडत-विवळत आहे. रात्री उशिरा कुत्र्याचं रडणं किंवा विवळण हे वाईट-अपशकुन असतो का? रात्री उशिरा रडणाऱ्या कुत्र्यांमुळे काही अशुभ घडण्याची भीती अनेकांच्या मनात असते. रात्रीच्या वेळी कुत्रे रडतात किंवा विवळतात याची कारणे जाणून घेऊया.
advertisement
1/6
मध्यरात्री कुत्र्याचं रडणं अशुभ का मानतात? वाईट बातमी, अमंगळ घडण्याशी संबंध..!
कुत्र्याच्या रडण्याशी संबंधित लोकांच्या मनात अनेक समजुती आहेत. सहसा रात्रीच्या वेळी कुत्र्याचे रडणे अशुभ मानले जाते. कुत्र्याचं रडणं चांगलं नाही, असं आपण घरातील वडीलधाऱ्यांकडून ऐकलं असेल. यामुळे काही वाईट बातमी कानी येण्याची शक्यता असते, असे मानले जाते. ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा कुत्र्याचं रडणं हे घडणाऱ्या अशुभ घटनेचा संकेत असू शकतो. कधी कधी त्यानंतर लगेच वाईट बातमीही ऐकायला मिळते. प्राचीन मान्यतेनुसार, कुत्र्यांना सर्वात प्रथम वाईट घटनेचा अंदाज येतो, म्हणून ते रडतात.
advertisement
2/6
शकुन शास्त्रानुसार, कोणाच्या घराबाहेर कुत्रा रडत असेल तर याचा अर्थ, घरात काही संकट येणार आहे. अशा परिस्थितीत काहीही करताना काळजी घ्यावी. घराच्या दारात कुत्रा रडल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते.
advertisement
3/6
असं मानलं जातं की, कुत्रा रात्री रडतो कारण त्याला त्याच्या आजूबाजूला नकारात्मक गोष्टी जाणवतात. अनेकवेळा कुत्रा स्वतःच काही अडचणीत असतो, त्याला काही शारीरिक त्रास असेल तर तो भुंकून किंवा मोठमोठ्याने रडून आपल्या साथीदारांना हाक मारण्याचा प्रयत्न करतो.
advertisement
4/6
अनेक वेळा कुत्रा एकटा असतानाही भुंकून-रडून आपल्या साथीदारांना हाक मारण्याचा प्रयत्न करतो. असे म्हणतात की, कुत्र्यांनाही एकटे राहणे आवडत नाही. अशा परिस्थितीत ते रडत किंवा भुंकून आपल्या सोबतच्या कुत्र्याला हाक मारतात.
advertisement
5/6
तुमच्या घरात पाळीव कुत्रा असल्यास आणि त्यानं रात्री अन्न खाल्ले नाही. दुःखी दिसत असेल, त्याच्या डोळ्यांतून अश्रू येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ते काही अशुभ घटनेचे लक्षण देखील असू शकते. पाळीव कुत्रा रात्री खात नसेल तर कदाचित त्याला काही शारीरिक समस्याही असू शकतात. काही लोक त्यास अशुभ आणि अप्रिय घटनांशी जोडतात.
advertisement
6/6
वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार, कुत्रा भुंकून किंवा रडून आपल्या मित्रांना संदेश देण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ असा आहे की कुत्रे त्यांच्या साथीदारांना संदेश पाठवण्यासाठी रडतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Dog Crying: मध्यरात्री कुत्र्याचं रडणं अशुभ का मानतात? वाईट बातमी, अमंगळ घडण्याशी संबंध..!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल