TRENDING:

Cricket Rules : क्रिकेटमध्ये 10 पद्धतीने आऊट होऊ शकतो खेळाडू, तुम्हाला किती माहिती आहेत?

Last Updated:
भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या क्रिकेट या खेळात एकूण 10 प्रकारे खेळाडू आऊट होऊ शकतो, यातले किती प्रकारचे आऊट तुम्हाला माहिती आहेत?
advertisement
1/11
क्रिकेटमध्ये 10 पद्धतीने आऊट होऊ शकतो खेळाडू, तुम्हाला किती माहिती आहेत?
भारतामध्ये 2023 चा वनडे वर्ल्ड कप दिमाखात सुरू झाला आहे. भारताने पहिल्या तीनही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय बॉलर्सनी तीनही सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचा भारतीय बॉलरनी ऑलआऊट केला, तर अफगाणिस्तानच्या 8 विकेट घेतल्या. भारतीय क्रिकेट चाहत्यांना या खेळाचे बहुतेक नियम माहिती आहेत, पण एखादा खेळाडू 10 प्रकारे आऊट होऊ शकतो.
advertisement
2/11
क्लीन बोल्ड : म्हणजेच, बॉलर समोर उभ्या असलेल्या बॅटरच्या मागे असलेले स्टम्प उडवतो, यामुळे बॅटरला पॅव्हेलियनमध्ये जावं लागतं.
advertisement
3/11
कॅच आऊट : हा क्रिकेटमध्ये आऊट होण्याचा अत्यंत सामान्य प्रकार आहे.
advertisement
4/11
एलबीडब्ल्यू म्हणजेच लेग बिफोर विकेट. बॉल बॅटरच्या बॅटला न लागता थेट पॅडला आणि स्टम्पच्या लाईनमध्ये लागला तर अंपायर एलबीडब्ल्यू आऊट देतो.
advertisement
5/11
रन आऊट : रन काढताना बॅटरला क्रीजपर्यंत येता आलं नाही आणि फिल्डरने बॉल स्टम्पवर लावला तर त्याला रन आऊट दिलं जातं.
advertisement
6/11
स्टम्पिंग : बॅटिंग करत असताना बॅटर क्रीजच्या पुढे आला, पण त्याला बॉल खेळता आला नाही आणि विकेट कीपरने बॉल स्टम्पला लावला तर बॅटर स्टम्पिंग आऊट होतो.
advertisement
7/11
हिट विकेट : यामध्ये शॉट खेळत असताना बॅटरची बॅट स्टम्पला लागते, त्यामुळे तो हिट विकेट आऊट होतो.
advertisement
8/11
ऑबस्ट्रक्टिंग द फिल्ड : जर एखादा बॅटर फिल्डर थ्रो करत असताना मुद्दाम स्टम्पच्या दिशेने जाऊन स्टम्प अडवत असेल तर त्याला ऑबस्ट्रक्टिंग द फिल्ड म्हणून आऊट दिलं जातं.
advertisement
9/11
हॅण्डल द बॉल : बॉल खेळल्यानंतर बॅटरने फिल्डिंग टीमला न विचारता बॉल पकडला किंवा स्टम्पवर जाणारा बॉल हाताने अडवला तर त्याला हॅण्डल द बॉल म्हणून आऊट दिलं जातं.
advertisement
10/11
मांकडिंग : नॉन स्ट्रायकर एण्डचा बॅटर बॉलर बॉल टाकण्याच्या आधीच क्रीजच्या बाहेर आला आणि बॉलरने स्टम्पवरच्या बेल्स उडवल्या तर त्याला मांकडिंग आऊट म्हणलं जातं.
advertisement
11/11
टाईम आऊट : एक बॅटर आऊट झाल्यानंतर दुसरा बॅटर मैदानात येण्यासाठी 90 सेकंदांचा वेळ दिला जातो. या निर्धारित वेळेत जर नवीन बॅटर मैदानात आला नाही, तर त्याला आऊट दिलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Cricket Rules : क्रिकेटमध्ये 10 पद्धतीने आऊट होऊ शकतो खेळाडू, तुम्हाला किती माहिती आहेत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल