TRENDING:

Arjun Tendulkar ने ठेवलं वडिलांच्या पावलावर पाऊल, सचिनने जे केलं तेच लेकानं केलं!

Last Updated:
Arjun Tendulkar Sanniya Chandhok Age Difference : टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू आणि क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकर याच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. सचिनला मुलगा अर्जुन याने नुकताच साखरपुडा उरकलाय.
advertisement
1/7
Arjun Tendulkar ने ठेवलं वडिलांच्या पावलावर पाऊल, सचिनने जे केलं तेच लेकानं केलं
सचिन तेंडूलकरची होणारी सून, सानिया चांडोक ही एक उद्योजिका असून, ती मुंबईतील Mr. Paws Pet Spa & Store LLP ची डिझिग्नेटेड पार्टनर आणि डायरेक्टर आहे. मात्र, अर्जुनने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
2/7
तर अर्जुन तेंडूलकर वडिलांप्रमाणे क्रिकेटमध्ये आपली छाप उमटवण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच अर्जुनने देखील अशी एक गोष्ट केलीये, जी सचिनने देखील केली होती. ती म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या मुलीशी लग्न...
advertisement
3/7
जसं सचिन आणि पत्नी अंजली यांच्या वयात पाच वर्षांचं अंतर आहे आणि अंजली सचिनपेक्षा मोठ्या आहेत, त्याचप्रमाणे अर्जुनची होणारी पत्नी सानिया चंडोकदेखील त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे.
advertisement
4/7
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा 13 ऑगस्ट 2025 रोजी साखरपुडा झाला. अर्जुनचा जन्म 24 सप्टेंबर 1999 रोजी झाला असून तो सध्या 25 वर्षांचा आहे.
advertisement
5/7
तर सानियाचा जन्म 23 जून 1998 रोजी झाला असून ती 26 वर्षांची आहे. म्हणजेच, सानिया अर्जुनपेक्षा जवळपास एक वर्षाने मोठी आहे. अर्जुन त्याची मोठी बहीण सारा तेंडुलकरपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे.
advertisement
6/7
सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी झाला असून तो सध्या 52 वर्षांचा आहेत. तर पत्नी अंजली तेंडुलकर यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1967 रोजी झाला असून त्या सचिनपेक्षा पाच वर्षांनी मोठ्या आहेत.
advertisement
7/7
सचिन आणि अंजली यांचा विवाह 24 मे 1995 रोजी झाला, त्यावेळी सचिन 22 वर्षांचे होते आणि अंजली 27 वर्षांच्या होत्या. आता अर्जुनने देखील तीच परंपरा कायम ठेवल्याचं बोललं जातंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar ने ठेवलं वडिलांच्या पावलावर पाऊल, सचिनने जे केलं तेच लेकानं केलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल