T20 WC Semi Final Schedule : सेमीफायनलसाठी 4 संघ ठरले, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोण भिडणार? पाहा संपूर्ण शेड्यूल
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
ICC Women's T20 WC 2024 Semi Final Schedule : आयसीसी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कप आता अंतिम टप्प्यात आला आहे. ग्रुप स्टेजचे सामने संपले असून आता सेमीफायनल सामन्यांना सुरूवात झालीये. अशातच सेमीफायनल सामन्याचं शेड्यूल कसं असेल? कधी रंगणार सामना जाणून घ्या.
advertisement
1/7

आयसीसी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील अखेरचा सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात पार पडला. या सामन्यात मोठा उलटफेर झाला अन् वेस्ट इंडिजने सेमीफायनलचं तिकीट मिळवलं.
advertisement
2/7
एकीकडे वेस्ट इंडिजने सेमीफायनलमध्ये जागा मिळवली असून ग्रुप बी मधून साऊथ अफ्रिका संघाने देखील सेमीफायनलचं तिकीट मिळवलं आहे.
advertisement
3/7
तर ग्रुप ए मधून ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहचणारा पहिला संघ ठरला. ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील 4 पैकी 4 सामने जिंकले अन् आरामात फायनलमध्ये प्रवेश केला होता.
advertisement
4/7
तर दुसरीकडे पाकिस्तानचा पराभव करून न्यूझीलंडने देखील सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. टीम इंडियाला न्यूझीलंडमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं.
advertisement
5/7
अशातच आता पहिला सेमीफायनल सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाईल. हा सामना गुरुवारी 17 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
advertisement
6/7
तर दुसरा सेमीफायनल सामना 18 ऑक्टोबर रोजी विंडिज विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना शारजाहच्या मैदानात पार पडेल.
advertisement
7/7
दरम्यान, दोन्ही सेमीफायनलमध्ये जिंकणारे संघ दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये 20 ऑक्टोबर रोजी भिडणार आहे. दुपारी दोन वाजता हा सामना होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 WC Semi Final Schedule : सेमीफायनलसाठी 4 संघ ठरले, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोण भिडणार? पाहा संपूर्ण शेड्यूल