TRENDING:

Jasprit Bumrah Retirement : 'जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल', समोर आलं मोठं कारण!

Last Updated:
Jasprit Bumrah Retirement From Test Cricket : टीम इंडिया स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह आगामी मॅचमध्ये खेळणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. अशातच आता मोहम्मद कैफ याने बुमराहच्या निवृत्तीवर मोठं वक्तव्य केलंय.
advertisement
1/7
'जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल', समोर आलं मोठं कारण!
टीम इंडिया स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह सध्या दुखापतग्रस्त आहे. काल त्याचा पाय मुरगळला होता. अशातच आता तो आगामी मॅचमध्ये खेळणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. अशातच आता मोहम्मद कैफ याने बुमराहच्या निवृत्तीवर मोठं वक्तव्य केलंय.
advertisement
2/7
जसप्रीत बुमराह येत्या काळात कसोटी क्रिकेटला निरोप देईल कारण त्याचे शरीर त्याला साथ देत नाही. मला वाटतं की तुम्ही त्याला आगामी कसोटी सामन्यांमध्ये खेळताना पाहू शकणार नाही आणि तो निवृत्तही होऊ शकतो, असं मोहम्मद कैफ म्हणाला.
advertisement
3/7
जसप्रीत बुमराह त्याच्या शरीराशी संघर्ष करत आहे. अनेक दुखापतीमधून तो बाहेर आलाय. पण आता त्याच्या स्पीडची बॉलिंग कमी झालीये. या कसोटी सामन्यात वेग दिसत नव्हता आणि तो एक खुद्दार माणूस आहे, असंही मोहम्मद कैफ म्हणाला.
advertisement
4/7
जर बुमराहला वाटत असेल की मी देशासाठी 100 टक्के देऊ शकत नाही, सामना जिंकू शकत नाही, विकेट घेऊ शकत नाही, तर तो स्वतः नकार देईल, ही माझी गट फिलिंग आहे, असंही मोहम्मद कैफ म्हणाला आहे.
advertisement
5/7
आम्हाला विकेट्स मिळत नाहीत हे वेगळे आहे पण आम्ही 125 च्या वेगाने गोलंदाजी करत आहोत आणि आम्हाला मिळालेली एक विकेट मिळाली ती पण कीपरने पुढे डायव्हिंग करत पकडली, असंही कैफ म्हणाला.
advertisement
6/7
बुमराहमध्ये अजूनही जोश आहे आणि त्याला देशासाठी खेळायचे आहे, पण तो शारीरिकदृष्ट्या हरला आहे. त्याने त्याची तंदुरुस्ती गमावली आहे. त्याचे शरीर त्याला साथ देत नाही. या कसोटी सामन्यातील त्याचे अपयश हे स्पष्टपणे दिसून येते, असंही कैफ म्हणाला.
advertisement
7/7
चाहत्यांना बुमराहशिवाय कसोटी सामने पाहण्याची सवय लावावी लागेल. मी प्रार्थना करतो की मी जे बोलत आहे ते चुकीचे आहे. परंतु या कसोटी सामन्यात मी जे पाहिले त्यावरून मला असं वाटतं, असं मत मोहम्मद कैफ याने व्यक्त केलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Jasprit Bumrah Retirement : 'जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल', समोर आलं मोठं कारण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल