माझं कुटुंब आहे, बाळ नुकतंच… संघातून वगळताच पत्नीसमोर ढसाढसा रडला होता टीम इंडियाचा खेळाडू
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
एकेकाळी कसोटी सामन्यात त्रिशतक ठोकणाऱ्या खेळाडूने टीम इंडियामध्ये कमबॅक केले आहे. तब्बल 8 वर्षांनंतर करुण नायरने पुन्हा एकदा त्याच्या खेळाच्या उत्तम कौशल्याने, त्याच्या कामगिरीने आणि जिद्दीने संघात स्थान मिळवले आहे. 20 जूनपासून भारत इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळणार आहे. यावेळेस टीम इंडियामध्ये फार मोठे बदल पाहायला मिळाले आहेत.
advertisement
1/7

एकेकाळी कसोटी सामन्यात त्रिशतक ठोकणाऱ्या खेळाडूने टीम इंडियामध्ये कमबॅक केले आहे. तब्बल 8 वर्षांनंतर करुण नायरने पुन्हा एकदा त्याच्या खेळाच्या उत्तम कौशल्याने, त्याच्या कामगिरीने आणि जिद्दीने संघात स्थान मिळवले आहे. 20 जूनपासून भारत इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळणार आहे. यावेळेस टीम इंडियामध्ये फार मोठे बदल पाहायला मिळाले आहेत.
advertisement
2/7
टीम इंडियामधल्या दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर संघ पहिल्यांदाच परदेशात खेळणार आहे आणि यावेळेस संघात अनेक तरुण खेळाडू असल्याने हा दौरा भारतीय संघासाठी एक मोठं आव्हान असणार आहे. अशातच आता भारतीय संघात बऱ्याच वर्षांनंतर स्थान मिळालेल्या करुणने अलीकडेच एक मोठा खुलासा केला आहे.
advertisement
3/7
इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करणाऱ्या करुण नायरसाठी गेल्या काही महिन्यांत खूप चांगले गेले आहे. कठीण काळातून गेलेल्या या भारतीय क्रिकेटपटूने 2022 मध्ये त्याची पत्नी सनाया टंकारीवालाच्या वाढदिवशी तो रडल्याचे उघड केले आहे.
advertisement
4/7
त्याच वेळी त्याने 'प्रिय क्रिकेट, मला आणखी एक संधी दे' असे ट्विट केले होते. त्यावेळी त्याला कर्नाटक राज्य संघातून वगळण्यात आले होते. ज्याला तो आता त्याच्या आयुष्यातील 'सर्वात कठीण काळ' म्हणून वर्णन करतो.
advertisement
5/7
जेव्हा कर्नाटकने त्याला सोडले तेव्हा इतर कोणताही संघ त्याला संधी देण्यास तयार नव्हता. सनायाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन दरम्यान त्याने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पण घरी परतल्यावर तो तुटून पडला. त्याच दिवशी त्याने एक पोस्ट पोस्ट केली - जी राष्ट्रीय संघात परतल्यापासून व्हायरल झाली आहे.
advertisement
6/7
'माझ्या पत्नीने जेव्हा मला विचारले, तू काय करतोयस? तेव्हा माझ्या भावना मला आवरता आल्या नाहीत आणि तिला सर्व काही सांगितले. तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असल्याचं तो म्हणाला'. ज्यावेळेस मला संघातून वगळण्यात आलं तेव्हा मला वाटलं की माझं जग संपलं आहे मला पुढे काय करावे हे माहित नव्हते. मी स्वतःला विचारत होतो की मी काय करावे? माझे एक कुटुंब आहे आणि माझा मुलगा नुकताच जन्मला आहे, पण मला काहीच सुचत नव्हते' असं करुण नायरने मेल ऑनलाईन दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
advertisement
7/7
गेल्या 12 महिन्यांत नायरने प्रत्येक देशांतर्गत स्पर्धेत भरपूर धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या चालू दौऱ्यासाठी त्याला आठ वर्षांत प्रथमच बोलावण्यात आले आहे. इंग्लंड लायन्सविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात द्विशतक झळकावून, नायरने प्लेइंग 11 मध्ये आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
माझं कुटुंब आहे, बाळ नुकतंच… संघातून वगळताच पत्नीसमोर ढसाढसा रडला होता टीम इंडियाचा खेळाडू