MCA ला धक्क्यांवर धक्के! मुंबई क्रिकेटमध्ये नेमकं घडतंय काय? Arjun ते Prithvi स्टार खेळाडूंनी सोडली संघाची साथ
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
गेल्या काही काळात मुंबई आणि भारतीय क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ झालेली पाहायला मिळाली आहे. या काळात अनेक दिग्गज आणि तरुण खेळाडूंनी संघ आणि फॉरमॅट सोडण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
advertisement
1/7

गेल्या काही काळात मुंबई आणि भारतीय क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ झालेली पाहायला मिळाली आहे. या काळात अनेक दिग्गज आणि तरुण खेळाडूंनी संघ आणि फॉरमॅट सोडण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
advertisement
2/7
पण या खेळाडूंनी असं अचानक संघ सोडण्याचं नेमकं कारण काय? काहींनी करिअर वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला तर काहींना चांगल्या संधी मिळाल्या असल्याचं कारण समोर आलं आहे. पण यामागचं खरं आणि नेमकं कारण काय हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
advertisement
3/7
अशातच आता काही तरुण खेळाडूंनी मुंबईची साथ सोडल्याच समोर येत आहे. कधीकाळी आयपीएल, रणजी आणि इतर लीग गाजवणाऱ्या खेळाडूंनी आता दुसऱ्या राज्यांकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आणि यासाठी त्या खेळाडूंनी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र मागितले आहे.
advertisement
4/7
Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा मुंबई क्रिकेट असोसिएशनचा भाग होता. अर्जुन तेंडुलकर मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण त्याला फारसे सामने खेळायला मिळाले नाहीत, त्यामुळे त्याने गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज आणि फलंदाज आहे. त्याने रणजीमध्ये कामगिरी केली आहे तर आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे.
advertisement
5/7
Siddhesh Lad : अर्जुन तेंडुलकरनंतर मुंबईला आणखी एक धक्का बसला. मुंबईच्या मिडल ऑर्डरचा फलंदाज सिद्धेश लाड यानेही एमसीएची साथ सोडली. देशांतर्गत क्रिकेटसाठी मुंबईच्या संघाची साथ सोडण्याचा निर्णय सिद्धेशने घेतला. लाड हा मुंबईच्या रणजी ट्र्रॉफी आणि दोन विजय हजारे चषकातील विजेत्या संघाचा भाग होता. परंतु, निवडकर्त्यांनी प्रतीक्षेत असलेल्या इतर तरूणांना संधी देण्याचा निर्णय घेतल्यानं त्याचं स्थान संशयाच्या भोवऱ्यात दिसलं.
advertisement
6/7
Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालने मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो आता गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणार होता. या निर्णयासाठी त्याने MCA कडून NOC देखील घेतले आहे. तो यापूर्वी मुंबई संघाकडून खेळत होता. गोव्याकडून खेळण्याचा निर्णय त्याने कर्णधारपदाच्या संधीमुळे घेतला, असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्याने MCA कडे NOC परत घेण्याची विनंती केली होती, पण त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
advertisement
7/7
Prithvi Shaw : भारताच्या अंडर 19 संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज पृथ्वी शॉ याला मागील अनेक वर्षांपासून टीम इंडियात संधी मिळालेली नाही. असं असतानाच पृथ्वी शॉ देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहे. क्रिकेटर पृथ्वी शॉला एका राज्याच्या क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेट खेळण्याची ऑफर मिळाली आहे. पृथ्वी शॉने एमसीएला पात्र लिहीत म्हटले की, 'करिअरच्या या टप्प्यावर मला एका दुसऱ्या राज्याच्या क्रिकेट असोसिएशनकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची ऑफर मिळाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
MCA ला धक्क्यांवर धक्के! मुंबई क्रिकेटमध्ये नेमकं घडतंय काय? Arjun ते Prithvi स्टार खेळाडूंनी सोडली संघाची साथ