मॅथ्यू हेडनच्या लेकीचा कहर, लाल ड्रेसमध्ये उडवली खळबळ, 7 वा फोटो पाहून तर हटणार नाही नजर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन याच्या मुलीचा दिल्ली प्रीमियर लीगमध्ये बोलबाला पाहायला मिळत आहे. मॅथ्यू हेडनच्या मुलीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. तसंच इंटरनेटवरून मॅथ्यू हेडनच्या मुलीबद्दल माहितीही गोळा करत आहेत.
advertisement
1/8

मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेस हेडन डीपीएलमध्ये अँकरिंग करताना दिसत आहे. ग्रेस हेडनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. (Photo grace.hayden_)
advertisement
2/8
आयपीएल 2025 मध्ये स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून काम केल्यानंतर आता डीपीएलमध्येही ग्रेस याच भूमिकेमध्ये दिसत आहे. डीपीएल मध्ये अँकरिंग करत असताना ग्रेस हेडनने घातलेले ग्लॅमरस कपडे चर्चेचा विषय ठरत आहे. (Photo grace.hayden_)
advertisement
3/8
ग्रेस हेडनच्या लाल रंगाच्या ड्रेसमधल्या व्हिडिओवर चाहत्यांकडूनही प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. ग्रेस हेडन ही भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकरची खास मैत्रिण आहे. (Photo grace.hayden_)
advertisement
4/8
डीपीएलमध्ये ग्रेस हेडनने खेळाडूंसोबत हिंदीमध्येही बातचित करत आहे. वेस्ट दिल्ली लायन्सचा बॉलर भगवान सिंग याच्यासोबत ग्रेस हेडनने हिंदीमध्ये चर्चा केली. भगवान सिंग याने ग्रेस हेडनला हिंदी वाक्य बोलायला लावलं. 'दिल्ली के चुतर चाट वाले ने चटपटी चाट चखाई', हे म्हणून दाखव, असं चॅलेंज भगवान सिंगने ग्रेसला दिलं. (Photo grace.hayden_)
advertisement
5/8
भगवान सिंगचं हे चॅलेंज ग्रेसने स्वीकारलं, पण त्याला संपूर्ण वाक्य हळू म्हणायला सांगितलं. ग्रेस हेडनने भगवान सिंग सोबतचा हा संवाद इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Photo grace.hayden_)
advertisement
6/8
ग्रेस हेडनला तिच्या आवडत्या भारतीय क्रिकेटपटूबद्दलही विचारण्यात आलं. तेव्हा तिने विराट कोहलीचं नाव घेतलं. 'भारतीय पुरुष टीममध्ये मला विराट कोहली सर्वाधिक आवडतो. तो किंग आहे, तो खरंच उत्कृष्ट खेळाडू आहे. आरसीबीसाठीही त्याने धमाकेदार कामगिरी केली आहे. त्याच्या चेहऱ्यावरच्या इमोशनचे बरेच जण फॅन आहे', असं ग्रेस हेडन म्हणाली. (Photo grace.hayden_)
advertisement
7/8
याशिवाय ग्रेस हेडनला ऋषभ पंतही आवडतो. एका मुलाखतीमध्ये ग्रेस हेडनने ऋषभ पंतचं कौतुक केलं होतं. आवडता भारतीय क्रिकेटपटू, केएल राहुल का ऋषभ पंत? असा प्रश्न विचारल्यानंतर ग्रेस हेडनने ऋषभ पंतचं नाव घेतलं. (Photo grace.hayden_)
advertisement
8/8
'ऋषभ पंतबद्दल माझ्या मनात खास स्थान आहे. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये दुखापत झाल्यानंतरही त्याने साहस दाखवलं आणि तो बॅटिंगला उतरला याबद्दल त्याला सलाम', असं ग्रेस हेडन म्हणाली. (Photo grace.hayden_)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
मॅथ्यू हेडनच्या लेकीचा कहर, लाल ड्रेसमध्ये उडवली खळबळ, 7 वा फोटो पाहून तर हटणार नाही नजर!