4-4-4-4-4-4-4-6-6, रोहित फॉर्ममध्ये असताना मिशेलने काढलं ट्रम्प कार्ड, कॅप्टनच्या जाळ्यात 'असा' अडकला हिटमॅन
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज अॅडलेडमधील अॅडलेड ओव्हल येथे खेळला जात आहे.
advertisement
1/7

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज अॅडलेडमधील अॅडलेड ओव्हल येथे खेळला जात आहे.
advertisement
2/7
या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
advertisement
3/7
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 9 बाद 264 धावा केल्या. संघाची सुरुवात चांगली झाली नाही, त्यांना फक्त 17 धावांवर पहिला धक्का बसला. कर्णधार शुभमन 9 धावांवर वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेटकडे बाद झाला.
advertisement
4/7
त्यानंतर बार्टलेटने त्याच षटकात विराट कोहलीला बाद केले . कोहली सलग दुसऱ्या सामन्यात आपले खाते उघडू शकला नाही. त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 198 धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला.
advertisement
5/7
रोहित शर्माने 74 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. 2015 नंतरचे हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात हळू अर्धशतक होते. रोहितचे एकदिवसीय क्रिकेटमधील हे 59 वे अर्धशतक होते. या सामन्यात रोहित शर्माने 7 चौके आणि 2 सिक्स मारले आणि त्याने अर्धशतक पूर्ण केल.
advertisement
6/7
पण ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराच्या जाळ्यात तो अडकला आणि विकेट गमावली. मिशेल मार्श हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे. रोहित फॉर्ममध्ये असताना, मिशेलने बॉलिंगमध्ये बदल केला आणि फॉर्ममध्ये असलेल्या रोहितची विकेट पडली.
advertisement
7/7
मिशेल स्टार्क बॉलिंग करत असताना रोहित क्रीजवर होता आणि रोहितची विकेट महत्वाची होती. स्टार्कने बॉल टाकला आणि हॅझेलवूडने कोणतीही चूक न करता ती कॅच पकडली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
4-4-4-4-4-4-4-6-6, रोहित फॉर्ममध्ये असताना मिशेलने काढलं ट्रम्प कार्ड, कॅप्टनच्या जाळ्यात 'असा' अडकला हिटमॅन