Yashasvi Jaiswal : एकच शतक ठोकलं, पण 5 कॅच सोडून 'इतक्या' धावा दिल्या,टीम इंडियाचा सगळ्यात मोठा व्हिलन!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा 5 विकेट्सनी पराभव झाला. या सामन्यात चौथ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंड संघाने विक्रमी 371 धावांचा पाठलाग केला.
advertisement
1/7

लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा 5 विकेट्सनी पराभव झाला. या सामन्यात चौथ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंड संघाने विक्रमी 371 धावांचा पाठलाग केला.
advertisement
2/7
टीम इंडियाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे या सामन्यातील त्यांची क्षेत्ररक्षण. विशेषतः यशस्वी जयस्वालने या सामन्यात एक-दोन नव्हे तर चार झेल सोडले. टीम इंडियासाठी फलंदाजांनी उत्तम कामगिरी केलीच पण फिल्डिंगमध्ये त्यांनी सर्वांनाच निराश केले आहे.
advertisement
3/7
फिल्डिंगमध्ये भारतीय खेळाडूंनी सर्वानांच निराश केल आणि खराब फिल्डिंगमुळे टीम इंडियाला 5 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या संपूर्ण सामन्यात यशस्वीने 1-2 नव्हे तर चार महत्वाच्या कॅच सोडल्या ज्यामुळे सामन्याचा रूप बदललं आणि भारताला हातचा सामना गमवावा लागला.
advertisement
4/7
यशस्वी जयस्वालने पहिल्याच दिवशी वादळी बॅटिंग करून शतक झळकावल. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 101 धावा केल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये तो 4 धावा करून बाद झाला. त्याने पहिल्या सामन्यात एकूण 105 धावा केल्या पण त्या उलट त्याने विरोधी संघाला 160 धावा दिल्या आहेत.
advertisement
5/7
इंग्लंडने 371 धावांचे लक्ष्य गाठले. यानंतर जयस्वालच्या क्षेत्ररक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्याच दिवशी त्याने बेन डकेट 15 धावांवर असताना पहिला कॅच सोडला आणि त्यानंतर बेनने 62 धावांची खेळी केली.
advertisement
6/7
तर दुसऱ्या दिवशी जयस्वालने ऑली पोपचा सोपा झेल सोडला. तर नंतर पोपने पहिल्या डावात शतक झळकावले. पोप 62 धावांवर असताना त्याने कॅच सोडला आणि त्यानंतर पोपने 106 धावा केल्या.
advertisement
7/7
ब्रूक 83 वर असताना जयस्वालने तिसरा कॅच सोडला आणि त्यानेही 99 धावा करत इंग्लंडला लक्ष्याच्या जवळ पोहोचले. सर्वात महत्त्वाचा क्षण पाचव्या दिवशी आला. जेव्हा बेन डकेट 97 धावांवर खेळत होता. त्याने स्क्वेअर लेगच्या दिशेने एक शॉट खेळला, पण जयस्वाल चेंडू पकडू शकला नाही. डकेटने 149 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली. इंग्लंडने 371 धावांचे कठीण लक्ष्य पाच विकेट गमावून साध्य केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Yashasvi Jaiswal : एकच शतक ठोकलं, पण 5 कॅच सोडून 'इतक्या' धावा दिल्या,टीम इंडियाचा सगळ्यात मोठा व्हिलन!