भयंकर थंडीतही मरत नाहीत हे 5 जीव! शरीराचा बर्फ झाला तरी जिवंत राहतात, कसं काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Animal Survived In Winter : कित्येक लोक, प्राण्यांचा जास्त थंडीत मृत्यू होतो. हायपोथर्मियामुळे जीव जातो. पण असे 5 प्राणी ज्यांच्याकडे थंडी सहन करण्याची इतकी क्षमता आहे की त्यांच्या शरीराचा बर्फ झाला, तरी ते पुन्हा जिवंत होतात.
advertisement
1/5

वुड फ्रॉग : हा उत्तर अमेरिकेतील प्राणी आहे. अलास्कामध्ये तो -5°F पेक्षा कमी तापमानात महिने टिकतो. हिवाळ्यात त्याच्या शरीरातील 65-70% पाणी गोठतं. यामुळे मेंदू, डोळे आणि हृदय गोठतं. त्याचा श्वास आणि हृदय थांबतं पण विशेष प्रथिने त्याच्या पेशींमधून पाणी बाहेर काढतात. ग्लुकोज नैसर्गिक अँटीफ्रीझ म्हणून काम करतं. वसंत ऋतूमध्ये तो वितळतो आणि पुन्हा उडी मारू लागतो जणू काही काहीच घडलंच नाही.
advertisement
2/5
इगुआना : हा उष्णकटिबंधीय सरपटणारा प्राणी अचानक थंडीत (40°F पेक्षा कमी) गोठतो. रक्ताभिसरण मंदावतं, त्याचं शरीर कडक होतं आणि तो झाडांवरून पडतो. पण यामुळे तो मरत नाही. उष्णता परत येताच तो हळूहळू सामान्य स्थितीत परत येतो. फ्लोरिडामध्ये हिवाळ्यात पडणाऱ्या इगुआनाचे व्हिडिओ व्हायरल होत राहतात.
advertisement
3/5
पेंटेड टर्टल हॅचलिंग्स : प्रौढ कासव थंडीचा सामना करू शकत नाहीत, पण छोटी पिल्लं कॅनडा आणि अमेरिकेच्या गोड्या पाण्याच्या भागात त्यांच्या शरीरातील 50% पाणी गोठलं तरीही टिकून राहतात. त्यांना ग्लिसरॉल आणि ग्लुकोजने संरक्षण मिळतं. ते त्यांचं चयापचय लक्षणीयरीत्या कमी करतात. ते हिवाळ्यात श्वास न घेता त्यांच्या घरट्यांमध्ये घालवतात.
advertisement
4/5
मगर : हिवाळ्यात तलाव गोठतात, पण मगर तिचं शरीर पाण्यात बुडवतात, फक्त त्यांचं नाक बर्फाच्या वर ठेवतात. ही 'स्नॉर्कलिंग'ची एक पद्धत आहे, ज्यामध्ये ते श्वास घेत राहतात, पण त्यांचं शरीर थंड पाण्यात स्थिर राहतं. बर्फ वितळल्यावर ते पुन्हा सक्रिय होतात. ही पद्धत अमेरिकन आणि चिनी मगर दोघांसाठीही काम करते.
advertisement
5/5
डार्कलिंग बीटल : हा अलास्कातील कीटर -100°F म्हणजे -73°C इतकं कमी तापमान सहन करू शकतो. ते 19°F वर गोठतं. पण झायलोमनन नावाचा साखर-आधारित अँटीफ्रीझ पेशींचं संरक्षण करतो. वितळल्यावर ते पुन्हा हालचाल करू लागतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
भयंकर थंडीतही मरत नाहीत हे 5 जीव! शरीराचा बर्फ झाला तरी जिवंत राहतात, कसं काय?