TRENDING:

Weird Tradition - भारतातील असं ठिकाण जिथं लग्नात नवरीचे वडील नवरदेवाला देतात 21 विषारी साप

Last Updated:
लग्नात साप देण्याची ही अजब प्रथा भारतात आहे.
advertisement
1/5
भारतातील असं ठिकाण जिथं लग्नात नवरीचे वडील नवरदेवाला देतात 21 विषारी साप
भारतात हुंडा कायद्यानं गुन्हा आहे. पण तरी काही लोक अजूनही हुंडा घेतात, देतात. हुंडा म्हणजे त्यात पैसे, सोन्या-चांदीचे दागिने, गाडी अशा वस्तू आल्या पण भारतातीलच असं एक ठिकाण जिथं हुंडा म्हणून साप दिला जातो.
advertisement
2/5
लग्नावेळी नवरीचे वडील नवरदेवाला एक दोन नव्हे तर तब्बल 21 विषारी साप देतात. यात गहू आणि डोमी प्रजातीच्या विषारी सापांचा समावेश असतो, जे चावल्यास एखाद्या व्यक्तीचं जगणे जवळजवळ अशक्य होतं.
advertisement
3/5
मुलीचं लग्न ठरताच तिचे वडील साप पकडायला सुरुवात करतात.  तुम्हाला आश्चर्य वाटेल जर हे विषारी साप नवरीच्या वडिलांनी जावयाला दिले नाहीत. तर लग्नही मोडतं.
advertisement
4/5
मध्य प्रदेशातील गौरिया समाजाची ही प्रथा शतकानुशतके सुरू आहे. गौरिया समाजाचे लोक विषारी साप पकडण्याचे काम करतात. हेच त्यांचं उत्पन्नाचे साधनही आहे. विषारी सापांचा खेळ दाखवून लोकांकडून ते पैसे मागतात.
advertisement
5/5
मुलीच्या यशस्वी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी ही धोकादायक परंपरा पाळली जाते.  भविष्यात जावई सापांचं प्रदर्शन करून आपल्या मुलीला आधार देऊ शकेल म्हणून मुलीचे वडील मुलीचं लग्न ठरताच साप पकडतात आणि लग्नात तो जावयाला देतात. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Weird Tradition - भारतातील असं ठिकाण जिथं लग्नात नवरीचे वडील नवरदेवाला देतात 21 विषारी साप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल