Chanakya Niti : मूर्ख राहा, स्वार्थी बना; आचार्य चाणक्य यांनी का दिला असा सल्ला
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya Niti In Marathi : हे जग बाहेरून जितकं सोपं दिसतं आतून ते तितकंच गुंतागुंतीचं आणि फसवं आहे. येथील नातेसंबंध बहुतेकदा स्वार्थावर आधारित असतात आणि हास्य धूर्तपणा लपवते. अशा परिस्थितीत आचार्य चाणक्य यांचा हा सिद्धांत आजच्या काळात खूप उपयुक्त ठरतो.
advertisement
1/5

आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान होते. त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूच्या सखोल आकलनावर आधारित धोरणं विकसित केली. त्यांच्या शिकवणी आजही तितक्याच प्रासंगिक आहेत जितक्या त्या काळात होत्या.
advertisement
2/5
आजच्या जगात, प्रत्येकजण हुशार आहे, पण प्रत्येकाचे हेतू स्पष्ट नाहीत. अशा परिस्थितीत जर तुम्ही उघडपणे सर्वांवर विश्वास ठेवला किंवा तुमचं सर्व शहाणपण उघड केलं तर लोक तुमचं नुकसान करतात. म्हणूनच चाणक्य सल्ला देतात की खरोखर शहाणे तेच असतात जे त्यांची हुशारी लपवून ठेवतात आणि गरज पडल्यासच त्याचा वापर करतात.
advertisement
3/5
तुम्ही प्रत्येक बाबतीत स्वतःला सर्वात जाणकार व्यक्ती म्हणून सादर केलं तर लोक तुमच्यापासून दूर जातील किंवा तुम्हाला खाली खेचण्याचा कट रचतील. मूर्ख असल्याचं भासवणं तुम्हाला इतरांचे खरे हेतू ओळखण्यास मदत करू शकते. जेव्हा तुम्ही गप्प राहता तेव्हा लोक त्यांचे खरे विचार प्रकट करू लागतात. ही रणनीती तुम्हाला संघर्षाशिवाय तुमचं ध्येय साध्य करण्यास मदत करते.
advertisement
4/5
चाणक्य नेहमी स्वार्थी राहायला सांगत नाहीत. ते म्हणतात की जेव्हा परिस्थिती बिघडू लागते, जेव्हा लोक तुमचा फायदा घेऊ लागतात, तेव्हा स्वतःच्या फायद्याचा विचार करा. स्वार्थी असणं म्हणजे इतरांचं नुकसान करणं नाही, तर तुमच्या हक्कांसाठी आणि आदरासाठी आवाज उठवणं असा अर्थ आहे.
advertisement
5/5
चाणक्य म्हणतात हुशार व्हा, हुशारीने वागा. हुशारी म्हणजे प्रत्येक परिस्थिती हुशारीने हाताळणे. तुमच्या शब्दांमध्ये आणि निर्णयांमध्ये संतुलन राखणं. चाणक्य नीती म्हणते की जे प्रत्येक परिस्थितीत थंड डोक्याने विचार करतात आणि योग्य वेळी त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करतात तेच जीवनात यशस्वी होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : मूर्ख राहा, स्वार्थी बना; आचार्य चाणक्य यांनी का दिला असा सल्ला