Chanakya Niti : अपमानाचा बदला कसा घ्यायचा? चाणक्यची खास नीती, समोरच्याची बोलती बंद होईल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya Niti In Marathi : बरेच लोक अपमान गिळून गप्प राहतात, पण हे खरोखर शहाणपण आहे का? अपमान करणाऱ्यांना कसं उत्तर द्यावं हे चाणक्यनीतीत सांगितलं आहे.
advertisement
1/5

आचार्य चाणक्य म्हणतात एखाद्या व्यक्तीने एकदा अपमान सहन केला तर त्याला ज्ञानी म्हटलं जाते. जर त्याने तो दोनदा सहन केला तर त्याला महान म्हटलं जातं, परंतु जो वारंवार अपमान सहन करतो त्याला मूर्ख म्हटलं जातं.
advertisement
2/5
आचार्य चाणक्य यांच्या मते, मानवी जीवनात आदराची किंमत मृत्यूपेक्षा जास्त असते. अपमान सहन केल्यानंतर बरेच लोक गप्प राहतात, परंतु वारंवार अपमान सहन करणं योग्य नाही. अपमानाचा एक घोट विषापेक्षा जास्त कडू असतो.
advertisement
3/5
जर कोणी तुमचा सतत अपमान करत असेल तर तुम्ही त्याच क्षणी त्याला योग्य उत्तर दिलं पाहिजे, अन्यथा लोक तुमच्या मौनाला कमकुवतपणा मानू लागतात.
advertisement
4/5
रागाच्या भरात उत्तर देण्याऐवजी शांत आणि गोड वर्तन स्वीकारा. यामुळे समोरच्या व्यक्तीला त्याची चूक लक्षात येईल. पुढच्या वेळी तो हे करण्यापूर्वी नक्कीच विचार करेल. जे इतरांचा अपमान करतात त्यांना जीवनात दुःख आणि अपयशाचा सामना करावा लागतो. अशा लोकांपासून अंतर ठेवणे चांगले.
advertisement
5/5
अपमान मनावर घेऊ नका, तर त्याला तुमची प्रेरणा बनवा आणि स्वतःला इतके मजबूत बनवा की तेच लोक तुमच्या यशाचे कौतुक करतील. आचार्य चाणक्य यांच्या मते, स्वतःला इतके यशस्वी बनवा की आज तुमचा अपमान करणाऱ्यांना उद्या तुमची प्रशंसा करावी लागेल. यामुळे त्यांना एके दिवशी त्यांची चूक लक्षात येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : अपमानाचा बदला कसा घ्यायचा? चाणक्यची खास नीती, समोरच्याची बोलती बंद होईल