Chanakya Niti : का रे दुरावा? कालांतराने नात्यात का येतं अंतर? चाणक्यनीतीत सांगितलीत कारणं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya Niti In Marathi : जे एकमेकांवर जीवापड प्रेम करतात त्यांना कालांतराने एकमेकांचं तोंडही पाहायची इच्छा नसते, असं का होतं? याबाबत आचार्य चाणक्य यांनी कित्येक वर्षे आधीच सांगितलं आहे.
advertisement
1/5

नातेसंबंध हे जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहेत. पण अनेकदा असं दिसून येतं की कालांतराने नात्यात दरी निर्माण होते आणि जवळीकता अंतरात बदलते. असं का घडतं? याचं उत्तर आपल्याला चाणक्यनीतीमध्ये मिळते.
advertisement
2/5
कोणत्याही नात्यात अंतर येण्याचं सर्वात मोठं कारण खोटेपणा आणि अविश्वास. जर नात्यात पारदर्शकता नसेल तर प्रेम हळूहळू कमकुवत होऊ लागतं. ज्या नात्यात फसवणूक असते तिथं विश्वास संपतो आणि अंतर वाढू लागतं.
advertisement
3/5
संवाद हे नातं टिकवून ठेवण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र आहे. जर काही गैरसमज असतील तर ते मनात ठेवण्याऐवजी संवादाने सोडवले पाहिजेत. जर लहान गैरसमज वेळेवर दूर झाले नाहीत तर ते नात्यांमध्ये दुरावा निर्माण करण्याचं कारण बनतात.
advertisement
4/5
कोणत्याही नात्याचा पाया प्रामाणिकपणा आणि परस्पर आदरावर अवलंबून असतो. जर आपण समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर केला आणि प्रत्येक परिस्थितीत सत्याच्या बाजूने उभे राहिलो तर नातं कधीही तुटत नाही.
advertisement
5/5
सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18मराठीने फक्त माहितीसाठी दिलेला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : का रे दुरावा? कालांतराने नात्यात का येतं अंतर? चाणक्यनीतीत सांगितलीत कारणं