Diwali Weird Tradition - कधी ऐकल्याही नसतील, दिवाळीच्या अशा अजब प्रथा-परंपरा
- Published by:Priya Lad
Last Updated:
देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते.
advertisement
1/5

दिवाळी म्हटलं की दिव्यांचा प्रकाश, आकाशकंदीलांची रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी, रंगबेरंगी रांगोळी... सामान्यपणे ही अशी दिवाळी. पण काही ठिकाणी थोड्या वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करतात. दिवाळीच्या अशा प्रथा-परंपरा ज्या तुम्ही कधी ऐकल्याही नसतील.
advertisement
2/5
मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये स्मशान घाटावर दिवाळी साजरी केली जाते. इथले लोक त्रिवेणी मुक्तिधाममध्ये दिवे पेटवून आपल्या पूर्वजांना आठवून दिवाळीचा सण साजरा करतात. कनेरी गावात राहणारा गुर्जर समाज दिवाळीचे तीन दिवस ब्राह्मणांचा चेहरा पाहत नाही.
advertisement
3/5
गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यात होळीच्या रंगाप्रमाणे एकमेकांवर फटाके फेकतात, एकमेकांवर आतिषबाजी करतात.
advertisement
4/5
गुजरातमध्येच काही लोक पूर्ण रात्र घीचा दिवा लावतात आणि सकाळी याच दिव्यातील काजळ महिला आपल्या डोळ्याला लावतात.
advertisement
5/5
सामान्यपणे दिवाळी म्हणजे तसा 4-5 दिवसांचा सण पण तरी तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी साजरी होते. पण मध्य प्रदेशमधील डही अंचलमधील 62 आदिवासी गावांत दोन महिने हा सण साजरा होता. इथं एक निश्चित तारीख नसते म्हणजे गावातील प्रमुख दिवाळी कधी साजरी करायची हे ठरवतात. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Diwali Weird Tradition - कधी ऐकल्याही नसतील, दिवाळीच्या अशा अजब प्रथा-परंपरा