5000 Rupee Note : बाजारात येणार 5 हजारांची नोट? नवीन वर्षाच्या सुरुवातीला 'मोठी' बातमी!
- Published by:Devika Shinde
Last Updated:
5000 Rupee Note : अलीकडे सोशल मीडियावर याबाबत बरीच चर्चा रंगली आहे की, नव्या वर्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 5 हजार रुपयांच्या नोटा चलनात आणणार असल्याचे बोलले जात आहे.
advertisement
1/13

सध्या भारतीय चलनात सर्वाधिक वापरली जाणारी नोट ही 500 रुपयांची आहे. 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यापासून 500 च्या नोटाच आपल्याला बाजारात पाहायला मिळत आहे.
advertisement
2/13
पण 500 ची नोट ही आता सर्वात मोठं चलन असल्यामुळे काही ठिकाणी आर्थिक व्यवहारात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सरकार गेल्या काही काळापासून उच्च मूल्याची नोटा बाजारात आणण्याचा विचार करत आहे.
advertisement
3/13
अलीकडे सोशल मीडियावर याबाबत बरीच चर्चा रंगली आहे की, नव्या वर्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 5 हजार रुपयांच्या नोटा चलनात आणणार असल्याचे बोलले जात आहे. 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यापासून तर या प्रकाराची चर्चा वाढली आहे. पण तुम्हाला यामागचं सत्य माहितीय का?
advertisement
4/13
खरं तर, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यापूर्वी देशात 5000 रुपयांची नोट होती. स्वातंत्र्यानंतर भारतात 5,000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा चलनात होत्या.
advertisement
5/13
1954 मध्ये 1000 रुपयांची नोट बाजारात आली होती आणि या नोटा 24 वर्षे चलनात होत्या. त्यानंतर 1978 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या तीन नोटा मागे घेतल्या.
advertisement
6/13
अलीकडे, सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की सरकार 5,000 रुपयांची नोट चलनात आणण्याचा विचार करत आहे. मात्र, यात कोणतंही तथ्य नाही. सध्या अशी कोणतीही शक्यता नसल्याचे आरबीआयच्या सूत्रांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.
advertisement
7/13
RBIने सांगितले की सध्या 5 हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची कोणतीही योजना नाही.
advertisement
8/13
सध्या 500 रुपयांची नोट चलनात सर्वात मोठी आहे. याशिवाय 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये, 20 रुपये आणि 10 रुपयांच्या नोटाही चलनात आहेत.
advertisement
9/13
या नोटा भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या गरजांसाठी पुरेशा आहेत, असे स्पष्ट करत आगामी काळात आर्थिक घडामोडींमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
advertisement
10/13
50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनात असल्याने आणि डिजिटल पेमेंट वाढत असल्याने RBI ला लगेच 5000 रुपयांची नोट बाजारात आणण्याची गरज वाटत नाही.
advertisement
11/13
डिजिटल पेमेंटचा विस्तार करण्यासाठी सरकार जोर देत आहे. UPI, इंटरनेट बँकिंग आणि डिजिटल वॉलेटमुळे रोखीची गरज कमी झाली आहे.
advertisement
12/13
या पार्श्वभूमीवर 5,000 रुपयांच्या नोटा चलनात येणार असल्याच्या प्रचारात तथ्य नसल्याचे आरबीआयच्या सूत्रांनी सांगितले. मध्यवर्ती बँकेने जनतेला केवळ अधिकृत स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियावरील अशा खोट्या अफवांकडे लक्ष देऊ नये.
advertisement
13/13
2016 मध्ये केंद्र सरकारने मोठ्या चलनी नोटा बंद केल्या होत्या. त्यानंतर जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्या. चलन तुटवडा पूर्ण करण्यासाठी 2000 रुपयांची नोट होती. जो नुकताच मागे घेण्यात आला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
5000 Rupee Note : बाजारात येणार 5 हजारांची नोट? नवीन वर्षाच्या सुरुवातीला 'मोठी' बातमी!