TRENDING:

Hangover: संपूर्ण खंबा पिऊन जरी झाला तर्राट, तरी नो टेन्शन; एकच गोळी आणेल लगेच शुद्धीवर!

Last Updated:
Tips to Overcome Hangover: दारू प्यायल्यानंतर त्याची नशा लवकर उतरत नाही, त्यामुळे असं काही असावं ज्याने दारूची नशा एका झटक्यात उतरेल असं अनेकांना वाटतं. पण आता ते एका गोळीमुळे शक्य आहे.
advertisement
1/11
संपूर्ण खंबा पिऊन जरी झाला तर्राट, तरी नो टेन्शन; एकच गोळी आणेल लगेच शुद्धीवर!
दारू प्यायल्यानंतर त्याची नशा लवकर उतरत नाही, त्यामुळे असं काही असावं ज्याने दारूची नशा एका झटक्यात उतरेल असं अनेकांना वाटतं. पण आता ते एका गोळीमुळे शक्य आहे. फक्त एका गोळीमुळे दारूचा प्रभाव खूपच कमी करता येऊ शकतो. या संदर्भात रिसर्चर्सना मोठं यश मिळालं आहे. ते एक जेल (Gel) तयार करतायत, ज्यामुळे दारूची नशा लवकर उतरेल. ही जेल सुरक्षित असेल. ती आयर्न ॲटम व मिल्क प्रोटीन बीटा लॅक्टोग्लोबुलिन यांचं कॉम्बिनेशन आहे.
advertisement
2/11
या जेलची पचनमार्गात अल्कोहोलशी टक्कर झाल्यावर हे कॉम्बिनेशन एका एन्झाइमची नक्कल करते आणि इथेनॉलचे एसीटेटमध्ये रूपांतर करते. ईटीएच ज्युरिकचे फूड सायंटिस्ट जियाकी सू व त्यांच्या टीममेट्सनी हा रिसर्च स्टडी नेचर नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये प्रसिद्ध केला आहे. हा अभ्यास अल्कोहोलचे परिणाम लगेच कमी करण्याचा मार्ग शोधण्याशी संबंधित आहे.
advertisement
3/11
जेव्हा आपले शरीर स्वतःच अल्कोहोलचं विघटन करतं तेव्हा बाय-प्रॉडक्ट ॲसिटॅल्डिहाइडची निर्मिती होते, त्यामुळे लोकांना दारूची नशा येते म्हणजेच हँगओव्हर होतो. ॲसिटॅल्डिहाइडमुळे लिव्हरला नुकसान होण्याचा धोका असतो.
advertisement
4/11
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे बायोकेमिस्ट ड्युओ जू यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन जेलची एक अतिशय चांगली गोष्ट म्हणजे ते अल्कोहोल थेट असिटेटमध्ये रुपांतरित होतं. म्हणजे मधेच ते टॉक्सिक बनत नाही. हे हायड्रोजेल-बेस्ड नॅनो-लिव्हरसारखे आहे जे आपल्यासाठी काम करते.
advertisement
5/11
दारू पोट आणि आतड्यांतील म्यूकस मेंबरेन लेयरमधून रक्ताच्या प्रवाहात एंट्री करते. दारू लोकांची फोकस व रिअॅक्ट करण्याची क्षमता कमी करते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. नियमितपणे खूप दारू पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे लिव्हरचे रोग, गॅस्ट्रोइंटेस्टीनल ट्रॅक्टची सूज आणि कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) मते, जास्त दारू प्यायल्याने दरवर्षी सुमारे 30 लाख लोकांचा मृत्यू होतो.
advertisement
6/11
ईटीएच ज्यूरिक संशोधकांनी एक प्रोटीन जेल विकसित केले आहे, जे गॅस्ट्रोइंटेस्टीनल ट्रॅक्टमधील अल्कोहोल विघटित करते. ईटीएचच्या अभ्यासानुसार, उंदरांमध्ये केलेल्या प्रयोगांमध्ये रक्तात घुसण्याआधी अल्कोहोलला हे जेल लवकर व कोणत्याही नुकसानाशिवाय ॲसिटिक ॲसिडमध्ये रुपांतरित करते. यामुळे व्यसन आणि शारीरिक हानी यासारख्या गोष्टी विकसित होतात.
advertisement
7/11
रिसर्चर्स जेल तयार करण्यासाठी साध्या व्हे प्रोटीनचा वापर केला जातो. लांब, पातळ रेशे तयार करण्यासाठी त्यांनी ते कित्येक तास उकळलं. सॉल्व्हंट म्हणून मीठ आणि पाणी घालून फायब्रिल्स एकत्र जोडले जातात आणि एक जेल तयार होते. बाकी डिलिव्हरी सिस्टिमच्या तुलनेत जेलचा फायदा असा की हा खूप हळू पचतो, पण अल्कोहोल तोडण्यासाठी जेलला इतर कॅटलिस्ट्सची गरज असते.
advertisement
8/11
फक्त एकदा दारू दिलेल्या व सलग 10 दिवस दारू दिलेल्या उंदरांवर संशोधकांनी नवीन जेलची चाचणी घेतली. जेलच्या रोगप्रतिबंधक प्रभावाने अल्कोहोलचा एक डोस घेतल्यानंतर उंदरांमध्ये अल्कोहोलची पातळी अर्ध्या तासात 40 टक्के कमी झाली. दारू प्यायल्यानंतर पाच तासांनी त्यांच्या रक्तातील अल्कोहोल लेव्हल कंट्रोल 56 टक्के कमी झाला. यात उंदरांना नुकसान पोहोचवणारे असिटॅल्डिहाइड कमी जमा झाले आणि त्यांनी लिव्हरमधील स्ट्रेस रिॲक्शन खूप कमी दाखवली.
advertisement
9/11
सलग 10 दिवस दारू दिलेल्या उंदरांवर जेलमुळे अल्कोहोलचे प्रमाण कमी झालेच, सोबतच पर्मनंट मेडिकल परिणाम दिसू लागले. रोज जेल दिलेल्या उंदरांमध्ये वजन कमी होणं, लिव्हरचं कमी नुकसान दिसून आलं. लिव्हरमध्ये मेटबॉलिजमसोबत चांगली ब्लड व्हॅल्यू असते. याशिवाय उंदरांच्या आतड्यांच्या टिश्यूना दारूमुळे होणारं नुकसान कमी होतं.
advertisement
10/11
व्हे प्रोटीन फायब्रिलच्या माध्यमातून आयर्न कंट्रोल करण्याच्या पहिल्या अभ्यासात संशोधकांना आढळून आलं होतं की आयर्न व दारूच्या रिॲक्सनमधून ॲसिटिक ॲसिड बनतं. त्यावेळी ही प्रक्रिया जास्त प्रभावी नव्हती, त्यामुळे त्यांनी आयर्नला प्रोटीन फायब्रिलशी जोडण्यासाठी रूप बदललं. मेजेंगांच्या मते, मोठ्या नॅनोपार्टिकल्सचा वापर करण्याऐवजी आम्ही लहान आयर्न ॲटमचा पर्याय निवडला, त्यांना फायब्रिल्सवर समान विभागता येतं. त्यामुळे अल्कोहोलसोबत जास्त चांगल्या रितीने, वेगाने रिॲक्शन तयार करता येते.
advertisement
11/11
रिसर्चर्सनी यापूर्वीच जेलच्या पेटंटसाठी अर्ज केलाय. माणसांवर वापरण्याची परवानगी मिळण्यापूर्वी याला अनेक क्लिनिकल चाचण्यांमधून जावं लागेल, त्यानंतरच ते सामान्य लोकांसाठी जारी होईल. हे जेल सर्व चाचण्यात यशस्वी होईल, असं रिसर्चर्सना वाटतंय, कारण व्हे प्रोटीन फायबर खाण्यायोग्य असल्याचं त्यांनी आधीच दाखवलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Hangover: संपूर्ण खंबा पिऊन जरी झाला तर्राट, तरी नो टेन्शन; एकच गोळी आणेल लगेच शुद्धीवर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल