असं ठिकाण जिथं 1 रुपयाचे 500 रुपये होतात; कुठे आहे हे ठिकाण?
- Published by:Priya Lad
Last Updated:
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याची भारतीयांची तक्रार आहे. पण बहुतेक देशात भारतीय रुपया इतका मौल्यवान आहे की तुम्ही विचारही केला नसेल. आपण किती श्रीमंत आहोत हे तुम्हाला समजेल.
advertisement
1/5

परदेशात प्रवास करताना भारतीय चलनाऐवजी त्या देशाचं चलन वापरावं लागतं. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य कमी असू शकते. परंतु वेगवेगळ्या देशांमध्ये चलन दर वेगवेगळे आहेत.
advertisement
2/5
पौंड आणि अमेरिकन डॉलरसह अनेक देशांचे चलन भारतीय रुपयापेक्षा महाग आहेत. पण जगातील अनेक देशांच्या चलनांच्या तुलनेत रुपया वधारला आहे. तसंच पाकिस्तान, बांगलादेशसह अनेक देशांचे चलन भारतीय चलनापेक्षा स्वस्त आहे. आपला रुपया ज्या देशात उच्च तो देश इराण.
advertisement
3/5
मध्यपूर्वेतील हा देश इतिहासातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक होता. अनेक लोक दरवर्षी इराणमध्ये प्राचीन मशिदी आणि ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी येतात. पण आता तो युद्ध- हल्ल्यासाठी ओळखला जातो.
advertisement
4/5
इराणी रियाल (IRR) हे इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे राष्ट्रीय चलन आहे. हे 100 दिनार (पैसे) मध्ये विभागले गेले आहे, परंतु रियालच्या कमी मूल्यामुळे दिनार व्यवहारात वापरला जात नाही. सध्या इराणी रियाल हे जगातील सर्वात कमी मूल्य असलेले चलन मानले जाते. याला देशातील राजकीय अस्वस्थता कारणीभूत आहे.
advertisement
5/5
इराणी चलन भारतीय रुपयापेक्षा स्वस्त असल्याने भारतीयांना अतिरिक्त फायदे मिळतात. इराणचे पश्चिम आशियाई चलन भारतीय चलनाच्या तुलनेत खूपच कमी आहे. 1 भारतीय रुपया 501 इराणी रियालबरोबर आहे.