Indian Railway : आजूबाजूचे लोक पाहत असतानाही ‘तो’ थांबला नाही... ट्रेनमधील वरच्या बर्थवर बसून व्यक्तीचं लज्जास्पद कृत्य
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ट्रेनमध्ये एका प्रवाशानं असं काही केलं की सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे.
advertisement
1/6

ट्रेनमध्ये एका प्रवाशानं असं काही केलं की सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. खरंतर ट्रेनमध्ये एक प्रवाशी चोरी करत होता आणि त्याला हे माहित नव्हतं की कोणी तरी त्याचा व्हिडीओ बनवत आहे.
advertisement
2/6
विशेष म्हणजे, हा माणूस चोरी करताना हसत-खिदळताना दिसतो आहे. म्हणजे चोरी करताना कोण त्याचं निरीक्षण करतंय, याची कल्पनाही त्याला नसावी, पण त्याचा हा व्हिडीओ समोर आल्यावर लोक मात्र भडकले आहेत.
advertisement
3/6
रेडिटवरील ‘r/IndianRailways’ या कम्युनिटीवर सर्वात आधी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. 43 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये स्लीपर कोचच्या सर्वात वरच्या बर्थवर बसलेला प्रवासी दिसतो. जेव्हा विक्रेते ट्रेमधून पदार्थ विकत फिरत असतात, तेव्हा हा इसम त्यांच्याकडून चोरून वस्तू घेतो. सुरुवातीला तो मँगो ज्यूसचा पॅक चोरतो, नंतर समोसे घेतो आणि अखेर पाण्याची बाटलीही चोरून घेतो. हे सर्व करताना तो मजा घेत हसतोय आणि त्याचं वागणं पाहून अनेक नेटिझन्स संतापले आहेत.
advertisement
4/6
या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटलं, "त्याच्या शेजारी बसलेल्यांनी का काहीच बोललं नाही?", तर काहींनी लिहिलं, "हे खूपच लज्जास्पद आहे. मेहनती विक्रेत्यांपासून चोरी करणे हे हसण्यावारी नेण्यासारखं नाही." काही लोकांनी यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
advertisement
5/6
या घटनेनंतर अनेकांनी असं सुचवलं आहे की विक्रेत्यांनी त्यांच्या जेवणाच्या ट्रेवर झाकण ठेवावं. कारण अशा घटनांमुळे ना फक्त चोरी होते, तर अन्नाच्या स्वच्छतेवरही प्रश्न निर्माण होतो. काही लोकांनी हीही चिंता व्यक्त केली की ट्रेनमधील प्रवाशांमध्ये नैतिक जबाबदारीचा अभाव वाढतोय.
advertisement
6/6
हा व्हिडीओ जरी एका प्रवाशाचा असला तरी, यातून संपूर्ण व्यवस्थेवर आणि आपल्यातील जबाबदारीवर प्रश्न उपस्थित होतो. जर तुम्ही अशी चोरी प्रत्यक्ष पाहिली, तर तुम्ही काय कराल? कारवाई कोण करणार? ही केवळ एक व्हायरल घटना नसून मेहनती विक्रेत्यांच्या स्वाभिमानाशी खेळ करणारी गोष्ट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Indian Railway : आजूबाजूचे लोक पाहत असतानाही ‘तो’ थांबला नाही... ट्रेनमधील वरच्या बर्थवर बसून व्यक्तीचं लज्जास्पद कृत्य