TRENDING:

Knowledge: आंबा हा फळांचा राजा, मग त्याची राणी कोण माहिती आहे का?

Last Updated:
जर आंब्याला फळांचा राजा म्हटलं तर फळांची राणीसुद्धा असायला हवीच. मग ती कोण? याबाबत अनेकांना माहितीच नाही.
advertisement
1/5
आंबा हा फळांचा राजा, मग त्याची राणी कोण माहिती आहे का?
उन्हाळा सुरू झाला की लोक आतुरतेने आंब्याची प्रतीक्षा करतात. गोड आंब्याची चव कधी चाखायला मिळते, असं अनेकांना होतं. तुम्ही कोणतंही फळ केव्हाही खाऊ शकता. मात्र, आंबा हे फळ तुम्ही फक्त उन्हाळ्यातचं खाऊ शकता.
advertisement
2/5
<a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/mango-health-benefits-which-variety-of-mango-will-benefits-body-more-mhpj-1159671.html">आंब्याचे बरेच प्रकार आहेत</a>. आंबा चवीला उत्तमच. पण चवीसोबतच आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत. <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/mango-fruits-benefits-for-diabetes-how-to-eat-health-tips-in-marathi-gh-mhkk-1166877.html">आंबा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं</a>, पचनक्रिया सुधारते, चरबी कमी करण्यात आंबा उपयुक्त ठरतो, असं सांगितलं जातं.
advertisement
3/5
<a href="https://news18marathi.com/photogallery/viral/forget-alphonso-mango-miyazaki-mango-known-as-most-expensive-mangos-in-world-price-is-in-lacks-mhds-1165136.html">आंबा हे भारताचं राष्ट्रीय फळसुद्धा आहे</a>. सर्वच बाबतीत अव्वल असलेला हा आंबा, म्हणूनच <a href="https://news18marathi.com/photogallery/viral/how-to-identify-chemical-and-natural-ripped-mangoes-tricks-to-identify-right-mangoes-mhds-1167557.html">आंब्याला फळांचा राजा</a> म्हटलं जातं. पण जर आंबा राजा तर मग त्याची राणी कोण? कोणत्या फळाला फळांची राणी म्हटलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
4/5
आंब्यांची राणी आहे मँगोस्टीन. ज्याचं शास्त्रीय नाव आहे, गार्सिनिया मँगोस्टाना जांभळ्या रंगाचं हे फळ ज्याच्या साल जाड आणि आतमध्ये पांढऱ्या बिया असतात. 
advertisement
5/5
या फळाला फूड ऑफ गॉड म्हटलं जातं. चवीला ते आंबट-गोड असतं.हे फळ दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये जास्त प्रमाणा मिळतं. थायलँड, मलेशिया आणि सिंगापूरमध्ये सर्वाधिक आढळतं. थायलंडचं हे राष्ट्रीय फळ आहे. भारतात ते वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Knowledge: आंबा हा फळांचा राजा, मग त्याची राणी कोण माहिती आहे का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल