Space day : अंतराळ दिनी ISRO ने पहिल्यांदाच दाखवलं चंद्रावरील अद्भुत दृश्य; Chandrayaan 3 चे नवे Photo समोर
- Published by:Priya Lad
Last Updated:
चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग साजरा करण्यासाठी यावर्षी भारत पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोने भारताच्या ऐतिहासिक चंद्र मोहिमेचे नवे फोटो शेअर केले आहेत.
advertisement
1/5

चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगला एक वर्ष पूर्ण झालं आहे. ही मोहीम भारताच्या अंतराळ मोहीमेतील मैलाचा दगड ठरली आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अशी कामगिरी करणारा पहिला देश ठरला.
advertisement
2/5
चांद्रयान-3 च्या यशाने जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली आहे. त्या निमित्ताने देशात 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जात आहे. भारताचा हा पहिलाच अंतराळ दिन.
advertisement
3/5
चांद्रयान 3 च्या लँडिंगच्या वर्धापनदिनी ISRO ने चांद्रयान 3 च्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने टिपलेले हजारो फोटो शेअर केले आहेत. विक्रमवर लँडर इमेजर (LI) आणि रोव्हर इमेजर (RI) ने घेतलेल्या प्रतिमा.
advertisement
4/5
या फोटोंमधून 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग पूर्ण करण्यापूर्वीच्या शेवटच्या क्षणांची साक्ष देत आहेत. या फोटोंमधून चंद्रावर लँडिंग होताना स्पेसक्राफ्ट कशाप्रकारे चंद्राजवळून जात होतं हे दिसत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात अंतिम लँडिंग करण्यासाठी चांद्रयान-3 चे स्थान निश्चित करण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा होता.
advertisement
5/5
RI कॅमने टिपलेली ही प्रतिमा चंद्रावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह छापण्याच्या प्रयत्नांचे दृश्य दाखवतं. पण ते फारसे यशस्वी झालं नाही कारण दक्षिण ध्रुवाजवळील चंद्राच्या मातीचा पोत अपेक्षेपेक्षा वेगळा असल्याचं आढळून आलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Space day : अंतराळ दिनी ISRO ने पहिल्यांदाच दाखवलं चंद्रावरील अद्भुत दृश्य; Chandrayaan 3 चे नवे Photo समोर