Eid 2025 : मुस्लिम समाजात पुरुष पांढरी जाळीदार टोपी का घालतात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ramdan eid 2025 : इस्लाम धर्मात नमाज आणि कुराण शरीफ पठण करताना टोपी घातली जाते. याशिवाय लोक धार्मिक सभांमध्ये टोप्या घालतात. विशेषतः या टोप्या पांढऱ्या जाळीदार असतात. या टोप्यांचं महत्त्व काय आहे?
advertisement
1/7

सर्व धर्माच्या लोकांची स्वतःची श्रद्धा आणि संस्कृती असते, ज्याचे त्या धर्माचे लोक पालन करतात. इतकेच नाही तर वेगवेगळ्या धर्माच्या लोकांमध्ये प्रार्थना करण्याची पद्धतही वेगळी आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की इस्लामला मानणारे लोक नमाज किंवा इतर प्रसंगी पांढरी टोपी का घालतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मुस्लिम नेटच्या पांढऱ्या टोप्या का घालतात.
advertisement
2/7
प्रत्येक धर्माची एक संस्कृती असते, ज्याचं पालन त्या धर्माचे लोक करतात. एखाद्या व्यक्तीच्या पेहरावावरूनही ती व्यक्ती कोणत्या धर्माची ते ओळखता येतं. जशी शीख लोकांची पगडी आणि मुसलमान लोकांच्या डोक्यावरील पांढरी जाळीदार टोपी.
advertisement
3/7
मुस्लिम देखील वेगवेगळ्या पंथांमध्ये विभागले गेले आहेत. पण सर्व मुस्लिमांमध्ये एक गोष्ट समान आहे ते म्हणजे त्यांच्या डोक्यावरील पांढरी जाळीदार टोपी. जे काही लोक सतत घालून असतात तर काही जण नमाज अदा करताना आणि कुराण शरीफ वाचताना आवर्जून घालतात.
advertisement
4/7
मुस्लिम धर्मात या पांढऱ्या टोपीचं काय महत्त्व आहेत, हे ही टोपी नेहमी का घालतात, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. काही लोकांचा असा विश्वास आहे की इस्लामचा प्रसार मध्यपूर्वेतून झाला आणि तिथल्या उष्णतेमुळे टोपी घालण्याची प्रथा होती, त्याशिवाय पगडी देखील वापरली जात होती.
advertisement
5/7
धार्मिक तज्ज्ञांच्या मते इस्लाममध्ये नमाज किंवा इतर धर्माशी संबंधित गोष्टी करताना टोपी घालणं बंधनकारक नाही. जर कोणी नमाजाच्या वेळी टोपी घातली नाही तर त्याची नमाज अवैध मानली जाणार नाही.
advertisement
6/7
टोपी घालणं हे 'सुन्नत' आहे आणि कुराण शरीफचे पठण करताना नमाजच्या वेळी ते घालणं शिष्टाचार मानलं जातं.पण जर एखाद्या व्यक्तीने काही ठोस कारण नसताना नमाजमध्ये टोपी घातली नाही तर ती नमाज मान्य होत नाही.
advertisement
7/7
फक्त मुस्लिमांमध्येच टोपी किंवा पगडीने डोकं झाकण्याची प्रथा नाही. बहुतेक धर्मांमध्ये धार्मिक प्रसंगी डोकं झाकण्याची प्रथा आहे. ख्रिस्ती धर्माप्रमाणे पोप आपलं डोकं टोपीने झाकतात. त्याचबरोबर शिखांना पग घालणं बंधनकारक आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक/ Canva AI)