TRENDING:

Mutton : मटणाचा कोणता भाग सर्वात जास्त पौष्टिक असतो?

Last Updated:
मार्गशीर्षचे गुरूवार संपल्यानंतर पहिला रविवार. अनेकांनी मटणाचा बेत केला आहे. पण त्यातील कोणता भाग सर्वात पौष्टिक हे अनेकांना माहिती नाही.
advertisement
1/9
Mutton : मटणाचा कोणता भाग सर्वात जास्त पौष्टिक असतो?
नॉनव्हेजमध्ये मटणाची क्रेझ वेगळी आहे. अशा परिस्थितीत हिवाळ्यात अंडी, चिकन आणि मटणाच्या मागणीत लक्षणीय वाढ होते. मात्र, या सर्वांमध्ये सर्वाधिक क्रेझ मटणाची आहे. मटण म्हणजे बोकडाचे मांस. पण, तांत्रिकदृष्ट्या मेंढ्या आणि बोकडाच्या मांसाला मटण म्हणतात. हे रेड मीटच्या श्रेणीत येते.
advertisement
2/9
यामध्ये लोह, प्रथिने आणि इतर जीवनसत्त्वे खूप चांगल्या प्रमाणात असतात. संशोधनानुसार 100 ग्रॅम मटणात 33 ग्रॅम प्रोटीन असते. याद्वारे, सामान्य व्यक्तीच्या दैनंदिन गरजेपैकी 60 टक्के प्रोटीनची पूर्तता होते. यासोबतच यामध्ये आयर्न, झिंक आणि व्हिटॅमिन बी12 चे प्रमाणही खूप चांगले असते. अशा परिस्थितीत आरोग्य तज्ज्ञ मटणाला जीवनसत्त्वे, खनिजे आणि चांगल्या दर्जाच्या प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणतात. याचे नियमित सेवन केल्याने शरीरात ऊर्जा आणि शक्ती टिकून राहते.
advertisement
3/9
100 ग्रॅम मटणात 234 कॅलरी ऊर्जा, 11 ग्रॅम चरबी, 135 मिलीग्राम सोडियम, 33 ग्रॅम प्रथिने, 109mg कोलेस्टेरॉल, 0.1 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 5.1 ग्रॅम संतृप्त चरबी, 10 मिग्रॅ कॅल्शियम, 4.76mg लोह, 409 MG पोटॅशियम असते.
advertisement
4/9
मटणाचा कोणता भाग सर्वोत्तम? : quora.com वर, डॉ. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, पुणेचे डॉ. अनूप गायकवाड यांनी सांगितले, जर तुम्हाला मटण आवडत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला बोकडाचे मांस घेताना या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही विकत घेत असलेल्या बोकडाचे वय काय आहे? उत्तम मटणासाठी, बोकड लहान किंवा वृद्ध नसावे. सरासरी 8 ते 10 किलो वजनाचे बोकड उत्तम असते.
advertisement
5/9
मटणाच्या रंगावरून बरेच काही कळू शकते, असे ते सांगतात. गुलाबी रंगाचे मांस सर्वोत्तम आहे. याशिवाय मटण करी शिजवायची असेल तर तुकडे लहान ठेवावेत. मोठे तुकडे शिजायला जास्त वेळ लागतो आणि चवही चांगली येत नाही. तसेच मटणात पुरेशा प्रमाणात हाडे असावेत. हाडे असलेले मांस चांगले असते. तुम्ही मांस आणि हाडे यांचे प्रमाण 70 : 30 ठेवावे.
advertisement
6/9
डॉक्टर अनुप पुढे सांगतात की, जर तुम्हाला मटणाची उत्तम चव आणि पौष्टिकता हवी असेल तर तुम्ही बोकडाचे पुढचे पाय, शोल्डर, छाती, घसा, बरगड्या आणि लिव्हर घ्या. या मुद्द्यावर आयआयटी बॉम्बेमध्ये काम केलेल्या अमृता मुखर्जी लिहितात की, मटण करीसाठी बोकडाची मांडी सर्वोत्तम आहे. त्यात लिव्हर टाकल्याने त्याची चव खूप वाढते. मांड्यांमध्ये हाडे आणि मांस चांगले असते.
advertisement
7/9
किती प्रमाणात खावे मटण? : लाल मांस हे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. पण, याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते जास्त प्रमाणात सेवन करायला लागाल. ब्रिटीश सरकारच्या आरोग्य वेबसाइट nhs.uk नुसार, जर एखादी निरोगी प्रौढ व्यक्ती रोज 90 ग्रॅमपेक्षा जास्त लाल मांस खात असेल तर त्याने ताबडतोब ते 70 ग्रॅमपर्यंत कमी केले पाहिजे.
advertisement
8/9
वास्तविक, मांसामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण खूप जास्त असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही याचे नियमित आणि जास्त प्रमाणात सेवन केले तर रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूप वाढू शकते. म्हणून मांसाचे सेवन संतुलित प्रमाणात केले पाहिजे, जेणेकरून तुमच्या प्रथिने आणि इतर जीवनसत्त्वांच्या गरजा पूर्ण होतील. तुम्ही जास्त प्रमाणात मांस खात असाल तर त्यामुळे आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. ब्रिटनमध्ये मोठ्या संख्येने लोक या कर्करोगाने ग्रस्त आहेत.
advertisement
9/9
हा भाग काढून टाका : ब्रिटीश आरोग्य विभागाची वेबसाइट म्हणजे NHS देखील मांस खरेदी करण्याबद्दल काही सल्ला देते. यानुसार, मांस खरेदी करताना, फक्त लाल भाग खरेदी करा. पांढरा भाग वेगळा करा. पांढरा भाग चरबीचा असतो आणि तो भाग तुम्ही जितका ठेवता तितके तुमच्या मांसात जास्त चरबी असते. याशिवाय मटणाला पर्याय म्हणून तुम्ही चिकनचे सेवन करू शकता. चिकनमध्ये मटणापेक्षा कमी फॅट असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mutton : मटणाचा कोणता भाग सर्वात जास्त पौष्टिक असतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल