कुणाला निरोप देताना टा-टा म्हणता खरं, पण तुम्हाला याचा अर्थ माहितीये का?
- Published by:Priya Lad
Last Updated:
टा-टा हा शब्द आला कुठून आणि कसा, शब्दाबाबत रंजक माहिती.
advertisement
1/7

जेव्हा आपण एखाद्याला निरोप देतो तेव्हा आपण निरोप घेण्यासाठी टाटा म्हणतो. हा शब्द भारतात सर्वत्र सर्रास वापरला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की लोक निरोप घेण्यासाठी 'टाटा' का म्हणतात? हा शब्द कुठून आला? टा-टा म्हणण्यामागे काय कहाणी आहे?
advertisement
2/7
ऑनलाइन प्लॅटफॉर्म Quora वर काही युझर्सनी हाच प्रश्न विचारला. ज्याचं उत्तर खूप मनोरंजक आहे. एका यूझरनं लिहिलं की, टाटा हा शब्द फक्त भारत आणि पाकिस्तानमध्ये बोलला जातो. जगातील इतर कोणत्याही देशात याचा वापर केला जात नाही. इंग्रजही ते बोलत नाहीत.
advertisement
3/7
बर्याच शब्दकोशांमध्ये असं म्हटलं आहे की, ब्रिटीश इंग्रजीनुसार टाटा शब्दाचा अर्थ अलविदा. मग इंग्रज ते का वापरत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला 250 वर्षे मागे जावं लागेल.
advertisement
4/7
काही युझर्सच्या मते, टाटा हा शब्दच नाही, हा एक प्रकारचा अपशब्द आहे. प्रादेशिक भाषेतून अपमानास्पद शब्द म्हणून उदयास आला आहे. असंही म्हटलं जातं की ब्रिटीश महिला हा शब्द भारतीय महिला आणि त्यांच्या मुलांसाठी वापरत. मात्र त्याची पुष्टी झालेली नाही.
advertisement
5/7
काही युझर्सच्या मते टाटा हा शब्द उर्दू भाषेतून आला आहे ज्याचा अर्थ पुन्हा भेटू किंवा गुडबाय असा होतो.
advertisement
6/7
विश्वसनीय सूत्रांनुसार, हा शब्द प्रथम 1823 मध्ये इंग्रजीमध्ये वापरला गेला. न्यूयॉर्क टाइम्सने 1889 मध्ये तो फेअरफेल शब्द म्हणून वापरला. पुढे 1940 मध्ये हा शब्द खूप लोकप्रिय झाला.
advertisement
7/7
त्यावेळी टीटीएफएनसाठी टाटा हा शब्द वापरला जात होता. टाटा फॉर नाऊ असं त्याचं पूर्ण रूप आहे. हा शब्द त्या काळातील रेडिओ कार्यक्रमात वापरला जायचा. नंतर अधिक लोक ते वापरू लागले. (सर्व फोटो प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
कुणाला निरोप देताना टा-टा म्हणता खरं, पण तुम्हाला याचा अर्थ माहितीये का?