TRENDING:

70 लोकांना लग्नाचं आमंत्रण दिलं आणि आला फक्त एकच; नवरीबाईला राग अनावर, उचललं टोकाचं पाऊल

Last Updated:
Wedding News : सामान्यपणे तुम्ही लग्न पाहिली असतील तर आमंत्रित केलेल्या लोकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त लोक येतात. त्यामुळे आमंत्रण केलेल्या लोकांपैकी फक्त एकच व्यक्ती लग्नाला आली असं सांगितलं तर साहजिकच आश्चर्य वाटेल. असं एका लग्नात घडलं आहे.
advertisement
1/5
70 जणांना लग्नाचं आमंत्रण दिलं, आला फक्त एक; नवरीला राग अनावर, उचललं टोकाचं पाऊल
लग्न ही कित्येकांच्या आयुष्यातील खास क्षण आणि या खास क्षणी आपल्या आयुष्यातील जवळच्या, महत्त्वाच्या व्यक्ती यायला हव्यात असं वाटतंच. त्यामुळे या लोकांना आवर्जून लग्नाच आमंत्रण दिलं जातं. एका महिलेने तिच्या लग्नात 70 लोकांना आमंत्रित केलं पण त्यातील फक्त एकच तिच्या लग्नाला आला. हे अजब आहे, पण यापेक्षा पुढे घडलं ते आणखी शॉकिंग. आपण बोलावलेले लोक आपल्या लग्नाला आले नाहीत म्हणून  महिलेला राग आला आणि तिने रागात नको तेच केलं.
advertisement
2/5
माहितीनुसार एक महिला एका कंपनीत गेल्या 5 वर्षांपासून काम करते. तिचं लग्न ठरलं आणि लग्नाला तिला तिच्या जवळच्या सहकाऱ्यांनाच बोलवायचं होतं. पण काहींना बोलावलं नाही तर त्यांना वाईट वाटेल, उगाच गैरसमज होतील, ऑफिसमध्ये तणाव निर्माण होईल म्हणून तिने आपल्या डिपार्टमेन्टमधील जवळपास 70 लोकांना आपल्या लग्नाला बोलावलं.
advertisement
3/5
लग्नाच्या दोन महिने आधी तिने ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना लग्नाचं आमंत्रण दिलं. इतकंच नव्हे तर तिने कित्येकांना गिफ्टही दिलं. तिने ऑफिसमधील लोकांसाठी 6 मोठे टेबल बुक केले होते.
advertisement
4/5
पण प्रत्यक्षात लग्नाच्या दिवशी फक्त एकच सहकारी आला तोसुद्धा तिचा ज्युनिअर होता. सगळे टेबल रिकामे राहिले. खूप अन्न वाया गेलं. माहेर आणि सासर दोन्ही कुटुंबासमोर तिला लाज वाटू लागली. ज्यांच्यासोबत इतकी वर्षे काम केलं, त्यांना आपल्या भावनेचं काहीच नाही, याचं दु:ख तिला वाटलं.
advertisement
5/5
लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच ही महिला ऑफिसला गेली आणि तिने नोकरीचा राजीनामा दिला. चीनमधील महिलेची ही स्टोरी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
70 लोकांना लग्नाचं आमंत्रण दिलं आणि आला फक्त एकच; नवरीबाईला राग अनावर, उचललं टोकाचं पाऊल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल